Advertisement

दहावीच्या घसरलेल्या निकालाबाबत आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

दहावीच्या घसरलेल्या निकालाबाबत शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वर्षा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

दहावीच्या घसरलेल्या निकालाबाबत आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
SHARES

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळानं जाहीर केलेल्या दहावी (SSC) परीक्षेचा निकाल १२ टक्क्यांनी घसरला. यंदाचा निकाल ७७.१० टक्के लागला असून, घसरलेल्या टक्केवारीबाबत शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वर्षा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राज्य मंडळाच्या विद्यार्थ्याचे अंतर्गत गुण कमी केल्याचा फटका यंदाच्या निकालाला बसला आहे. त्यामुळं ११वी प्रवेशात विद्यार्थ्यांची मोठी पीछेहाट झाली आहे. राज्य मंडळाचे अनेक विद्यार्थी नापासही झाले असून, त्यामुळं हे विद्यार्थी शिक्षण प्रवाहाच्या बाहेर फेकले जाण्याची भीती देखील आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना बोलून दाखविली.

अंतर्गत गुण आवश्यक

निकालात झालेल्या घसरणीचा फटका महापालिका शाळांनाही बसला आहे. त्यामुळं या शाळांतील प्रवेशांवर देखील त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अंतर्गत गुण आवश्यक असल्याचं मत ठाकरे यांनी मांडलं. तसंच, 'या नवीन शैक्षणिक २०१९ -२० वर्षी भाषा आणि समाजशास्त्र विषयाची अंतर्गत परीक्षा सुरु करण्यात यावी आणि सध्या सुरु होणाऱ्या ११वी प्रवेशासाठी राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी तुकड्या वाढवून देण्यात यावी' अशा या मागणी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडं केली.

मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन

आदित्य ठाकरेंच्या या मागण्यांच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्य लक्षात घेत त्यावर लवकरच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा करून या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांना दिले.हेही वाचा -

मुंबईत पाणीकपात, रहिवाशांचे प्रचंड हाल

बेस्टच्या ताफ्यात ३ महिन्यात दाखल होणार २५ टक्के बसगाड्याRead this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा