Advertisement

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू; अनेक बदलांमुळं विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ

आता प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. गुणवत्ता यादी १३ नोव्हेंबरला जाहीर करण्यात येईल, तर पहिली प्रवेश यादी १५ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू; अनेक बदलांमुळं विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ
SHARES

वैद्यकीय (mbbs) आणि दंतवैद्यकीय (bds) अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश प्रक्रियेत यंदा करण्यात आलेल्या बदलांनी विद्यार्थी गोंधळले आहेत. अखिल भारतीय कोट्यातील पहिली फेरी झाल्यानंतर राज्याची गुणवत्ता यादी जाहीर होणार असल्यामुळे कोणत्या प्रक्रियेला प्राधान्य द्यायचे, असा प्रश्न विद्यार्थ्यांना (students) पडला आहे.

राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा (नीट) निकाल १६ ऑक्टोबरला जाहीर झाला. त्यानंतर देशपातळीवरील प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली. मात्र, राज्यातील प्रक्रिया सुरू करण्यात आली नाही किंवा राज्याची गुणवत्ता यादीही जाहीर करण्यात आली नाही. दरम्यान आता प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. गुणवत्ता यादी १३ नोव्हेंबरला जाहीर करण्यात येईल, तर पहिली प्रवेश यादी १५ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

  • प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी – १२ नोव्हेंबर, संध्याकाळी ५ वाजेपर्यंत
  • महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम देणे – ६ ते १३ नोव्हेंबर
  • पहिली गुणवत्ता यादी – १३ नोव्हेंबर, सकाळी ८
  • पहिली प्रवेश यादी – १५ नोव्हेंबर, संध्याकाळी ५
  • पहिल्या यादीनुसार प्रवेश घेणे – २० नोव्हेंबर, संध्याकाळी ५ वाजेपर्यंत

यंदा नीटचा निकाल वाढल्यामुळे राज्याच्या यादीत नेमके स्थान कसे आहे याबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. महाविद्यालयांमध्ये राखीव असलेल्या १५ टक्के जागांवरील प्रवेश अखिल भारतीय कोट्यातून करण्यात येतात. या कोट्याची प्रवेश यादी जाहीर झाल्यानंतर राज्याची गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे अखिल भारतीय कोट्यातून प्रवेश घ्यायचा की राज्याच्या कोट्यातून प्रवेश घ्यायचा याचा निर्णय घेता येणे शक्य नाही, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. राज्याने गुणवत्ता यादी अखिल भारतीय कोट्याच्या यादीपूर्वी जाहीर करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.


सध्याच्या वेळापत्रकानुसार १२ नोव्हेंबपर्यंत विद्यार्थ्यांनी अर्ज भरायचे आहेत, तर १३ नोव्हेंबरला रात्री १२ वाजेपर्यंत महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. राज्याची गुणवत्ता यादी १३ नोव्हेंबरला सकाळी जाहीर करण्यात येणार आहे. कोणत्या महाविद्यालयातील उपलब्ध जागा किती आहेत, राज्याच्या यादीतील स्थान काय आहे यानुसार कोणत्या महाविद्यालयाचे प्राधान्यक्रम द्यायचे याचा अंदाज विद्यार्थी घेतात.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा