Advertisement

पालकांना 'ब्लू व्हेल' नंतर 'मोमो' गेमची धास्ती!

शाळकरी मुलांमध्ये ब्लू व्हेलनंतर 'मोमो' या गेमची चर्चा सुरू झाल्यानं पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळे मुंबईतील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे मुंबई विभागीय अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी याप्रकरणी थेट केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्याकडे धाव घेतली आहे. विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता या गेमवर भारतात बंदी घालण्याची लेखी मागणी बोरनारे यांनी रवीशंकर प्रसाद यांना ई-मेलद्वारे केली आहे.

पालकांना 'ब्लू व्हेल' नंतर 'मोमो' गेमची धास्ती!
SHARES

'ब्लू व्हेल' या ऑनलाइन गेमनंतर आता देशभरातील पालक आणि शिक्षकांना चिंता सतावू लागलीय ती 'मोमो' गेमची. त्यामुळेच या गेमवर बंदी घालण्याची मागणी मुंबईतील शिक्षकांकडून करण्यात आली आहे. या मागणीसाठी मुंबईतील शिक्षक परिषदेनं केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांना ई-मेल केला असून त्याची तात्काळ दखल घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.


'मोमो' गेमचं थैमान

सध्या देशभरात 'मोमो' या ऑनलाइन गेमचं थैमान सुरू असून सोशल नेटवर्किंग साइटवरही या गेमची सर्वाधिक चर्चा आहे. 'मोमो' व्हॉट्सअॅप चॅलेंज तरुणांना आत्महत्या करायला प्रवृत्त करत असल्यानं पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी इथं एका कॉलेज विद्यार्थिनीनं 'मोमो' गेम विरोधात लेखी तक्रार नोंदवली आहे.



तसंच शाळकरी मुलांमध्ये ब्लू व्हेलनंतर 'मोमो' या गेमची चर्चा सुरू झाल्यानं पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळे मुंबईतील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे मुंबई विभागीय अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी याप्रकरणी थेट केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्याकडे धाव घेतली आहे. विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता या गेमवर भारतात बंदी घालण्याची लेखी मागणी बोरनारे यांनी रवीशंकर प्रसाद यांना ई-मेलद्वारे केली आहे.


काय आहे 'मोमो' गेम?

'मोमो' गेमच्या सुरूवातीला तुमच्या व्हॉट्सअॅपवर एक नंबर येतो. हा नंबर ‘मोमो’ या नावाने सेव्ह केलेला असतो. त्यावर एका विचित्र चेहऱ्याच्या बाईचा फोटो असून त्याखाली कॉन्टॅक्ट मी असा मॅसेज लिहलेला असतो. अनेक लोक उत्सुकतेपोटी हा नंबर सेव्ह करतात आणि तिथूनच या 'मोमो' गेम ला सुरूवात होते.




काय असतं चॅलेंज?

हा 'ब्ल्यू व्हेल' चॅलेंजप्रमाणेच एक ऑनलाईन गेम असून व्हाट्सअ‍ॅप अकाऊंटच्या माध्यमातून विशिष्ट युजर्सकडून आलेले विविध चॅलेंजेस स्वीकारायचे असतात. यात सहभाग होणाऱ्याला अतिशय भयंकर हिंसक असे व्हिडिओज, प्रतिमा अथवा अ‍ॅनिमेशन्स पाठविले जातात. यातून त्याचं ब्रेनवॉश करून त्याला हिंसक कृत्यासाठी तयार केलं जातं. त्यानंतर एकप्रकारे हिप्नोटाईज करुन कॉलरला आत्महत्येकडे वळवण्याचा प्रयत्न केला जातो.


काही वर्षांपूर्वी 'ब्लू व्हेल' गेमची दहशत निर्माण झाली होती. त्यानंतर आता 'मोमो' चॅलेंज हा गेम समोर आला आहे. सध्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांकडं स्मार्टफोन असल्यानं विद्यार्थ्यांना तो सहज हाताळायला मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विविध गेमचं वाढत आकर्षण असून अशाप्रकारच्या जीवघेण्या गेममुळं विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे. त्यामुळं अशा प्रकारच्या गेमवर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे
- अनिल बोरनारे, मुंबई विभागीय अध्यक्ष, शिक्षण परिषद



हेही वाचा-

जागतिक आत्महत्या निवारण दिन विशेष : आत्महत्येचा विचार दूर करणारं 'अॅप'

'अशा' गेमपासून सावध रहा!, नाहीतर असं तुमच्यासोबतही घडू शकतं



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा