Advertisement

बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १२वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाणाच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे.

बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता?
(Representational Image)
SHARES

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १२वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाणाच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. इयत्ता १२वीच्या प्रश्नपत्रिका बुधवारी आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली. त्यामुळं परीक्षा पुढे ढकलणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, 'प्रश्नपत्रिका जळाल्या तरी १२वीची परीक्षा नियोजित तारखेला येत्या ४ मार्चपासूनच सुरू होईल' अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी इंडियन एक्स्प्रेस या वृत्तवाहिनीला दिली.

'प्रश्नपत्रिका जळाल्या तरी १२वीची परीक्षा नियोजित तारखेला येत्या ४ मार्चपासूनच सुरू होईल. विद्यार्थ्यांनी परीक्षेबाबत निश्चिंत राहून केवळ अभ्यासाकडे लक्ष द्यावे. प्रश्नपत्रिका पुन्हा छापून घेण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल', असं शरद गोसावी यांनी म्हटलं.

राज्य मंडळातर्फे इयत्ता १२वीची परीक्षा येत्या ४ मार्च ते ३० मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेच्या नियोजनाच्या दृष्टीने राज्य मंडळानं परराज्यातून प्रश्नपत्रिकांची छपाई करून घेतली.

या प्रश्नपत्रिका एका ट्रकमधून नाशिकमार्गे पुण्याच्या दिशेने येत असताना या ट्रकला आग लागली. त्यात १२वीच्या प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या. त्यामुळे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी आणि सचिव अशोक भोसले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली.

प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्याने बारावीच्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागतील का, असा प्रश्न निर्माण झाला. १२वीच्या परीक्षा हा संवेदनशील विषय असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. परंतु, विद्यार्थ्यांनी परीक्षेची चिंता करू नये, असे राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा