Advertisement

वयात येणाऱ्या मुलींसाठी शालेय स्तरावर मासिक पाळीचं प्रशिक्षण

शाळेत वयात येणाऱ्या मुलीची होणारी घुसमट लक्षात घेता त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण व्हावी या दृष्टीने शिक्षण विभागाने एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. शिक्षण विभागाने मासिक पाळी व्यवस्थापन हा कार्यक्रमच हाती घेतला आहे.

वयात येणाऱ्या मुलींसाठी शालेय स्तरावर मासिक पाळीचं प्रशिक्षण
SHARES

शाळेतील मुलींना आता मासिक पाळीचे धडे शाळेतच मिळणार आहेत. शाळेत वयात येणाऱ्या मुलीची होणारी घुसमट लक्षात घेता त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण व्हावी या दृष्टीने शिक्षण विभागाने एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. शिक्षण विभागाने मासिक पाळी व्यवस्थापन हा कार्यक्रमच हाती घेतला आहे.

जस-जशी मुलगी मोठी होते, तसतसे तिच्या शरीरात अनेक बदल होऊ लागतात. शारीरिक आणि मानसिक असे दोन्हीही बदल होत असतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, ६० ते ७० टक्के मुली या मासिक पाळीच्या दरम्यान शाळेत अनुपस्थित राहतात. केवळ गावाकडे नाही, तर मुंबईसारख्या शहरात देखीलमासिक पाळीवर उघडपणे बोललं जात नाही. स्त्रियांशी या विषयावर मोकळेपणाने संवाद साधला जात नाही. अशा परिस्थिती मुलींना योग्य माहिती मासिक पाळीबद्दल दिली जात नाही. त्यामुळे बहुतांश मुली या काळात शाळेत जाणे टाळतात. अशावेळी मुलींना योग्य शिक्षण मिळाले व मार्गदर्शन मिळाले, तर या परिस्थितीत बदल होईल. त्यासाठी 'स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय' मिशनमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी नगरपालिका स्तरावर टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार आहे.


टास्क फोर्सची भूमिका

टास्क फोर्सने जिल्ह्यातील मासिक पाळी व्यवस्थापन उपक्रमाची अंमलबजावणी व त्याचे नियंत्रण, या अत्यंत महत्वाच्या जबाबदाऱ्याही पार पाडायच्या आहेत. त्याचे प्रमुख तीन घटक पुढीलप्रमाणे -

1) मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षणाच्या दर्जात कोणतीही तडजोड होत नाही याची खात्री करणे

2) या उपक्रमाचा आढावा घेणे व त्याबाबत शासनाला अहवाल देणे

3) झालेल्या उपक्रमांचे अहवाल तयार करणे


या सुविधा शाळेत आवश्यक

१) प्रशिक्षणाच्या माध्यमातून मुलींना मासिक पाळी व्यवस्थापन शिकवणे

२) मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छ शौचालय शाळेत असणे आवश्यक

३)  मुलींना कपडे बदलता येतील अशी व्यवस्था असणे गरजेचे

४) शाळेत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणे

५) वापरलेल्या नॅपकिनची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक


पालकांचा सहभाग महत्त्वाचा

केवळ शाळेत व्यवस्थापन करणे आवश्यक नाही, तर मुलींच्या घरीही याबाबत जागृती होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालकसभांच्या माध्यमातून पालकांशीही याबाबत चर्चा व मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.



हेही वाचा

मासिक पाळी..समज कमी, गैरसमज जास्त!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा