शाळांमध्ये वायफाय, शिक्षक होणार हायटेक

 Churchgate
शाळांमध्ये वायफाय, शिक्षक होणार हायटेक

मुंबई - डिजिटल इंडिया उपक्रमाअंतर्गत राज्यातील सर्व शाळांमध्ये लवकरच वायफाय सुविधा उपलब्ध होणाराय. सध्याचं युग टेक्नोसॅव्ही असल्यामुळे सर्वच शिक्षकांनी टेक्नोसॅव्ही तंत्र आत्मसात केलंय. राज्यातील शिक्षकांनी 2 हजार 306 शैक्षणिक अॅप्स, 5 हजारपेक्षा जास्त शैक्षणिक व्हीडीओ तसंच अनेकांनी स्वत: संकेतस्थळ आणि ब्लॉगची निर्मिती केलीय. शाळेतील वायफाय सुविधेमुळे या शिक्षकांना शाळेत ई - शैक्षणिक साहित्याचा वापर करणे सोयीस्कर ठरणाराय.

शिक्षकांनी कोणते ई-साहित्य वापरावे, ते कसे शोधावे यासाठी शालेय शिक्षण विभागानं 'एकस्टेप' या संस्थेशी चर्चा केली. पाठ्यपुस्तकातील धड्यांवर आधारित ई-साहित्य http://community.ekstep.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. या ई-साहित्याचा जास्तीत जास्त शिक्षकांनी उपयोग करावा, असं आवाहन शिक्षण विभागाच्या उपसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी केलंय.

Loading Comments