Advertisement

ठरलं! मुंबईतल्या शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार

शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

ठरलं! मुंबईतल्या शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार
SHARES

शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार मुंबईतल्या शाळा ४ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहेत. आठवी ते बारावीचे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरु होतील.

राज्यात ४ ऑक्टोबर पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  ग्रामीण भागातील ५वी ते १२वी आणि शहरी भागात ८वी ते १२वीचे वर्ग सुरू होणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.

शाळा सुरू करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे सर्व अधिकार देण्यात आले आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करुन शाळा सुरू ठेवण्यात येणार आहेत. शाळा सुरू करण्यासंदर्भात टास्क फोर्सकडून सूचना मिळाल्या आहेत.

राज्य सरकारनं दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन करुन मुंबईतल्या शाळा सुरू होणार आहेत. आता एका बाकावर एक विद्यार्थी, एक दिवसाआड उपस्थिती यासह इतर नियमांचं पालन करुन मुंबईतल्या शाळा सुरू करण्यात येणार आहेत.

मुंबईत शिक्षकांसाठी विशेष लसीकरण मोहीम सुरू आहे. शिक्षकांचं ७० टक्के लसीकरणही झालं आहे. पालिकेच्या १० हजार शिक्षकांपैकी ७ हजार शिक्षकांच लसीकरण झालं आहे. या सर्वांचा आढावा घेण्यात येणार आहे, असंही  किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

दरम्यान ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू होत आहेत पण विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक असेल, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे पालक मंजुरी देणार नाहीत त्यांना उपस्थित राहण्यासाठी सक्ती करु नये, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.



हेही वाचा

MHT CET 2021 : पावसामुळे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा, पुन्हा होणार परीक्षा

महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या परीक्षेची नवीन तारीख जाहीर, 'या' दिवशी होणार परीक्षा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा