पालिकेची स्वच्छतेसाठी मोहीम


  • पालिकेची स्वच्छतेसाठी मोहीम
  • पालिकेची स्वच्छतेसाठी मोहीम
  • पालिकेची स्वच्छतेसाठी मोहीम
SHARE

लोअर परेल - जी दक्षिण पालिका विभागानं लोअर परेल, वरळी आणि सात रस्ता हे विभाग स्वच्छ करण्यासाठी मोहीम हाती घेतलीय. बुधवारी पालिका अधिकारी आणि स्वछता कामगार यांनी लोअर परेलमधल्या प्रत्येक चाळीत आणि सोसायटीत जाऊन स्वछतेचे धडे दिले. त्याचबरोबर ओला, सुका कचरा वेगवेगळ्या कचरपेटीत टाकण्याचं आवाहन केलं.

मुंबईत दररोज सुमारे नऊ हजार मेट्रिक टन कचरा जमा होतो. कचऱ्यासाठी शहरात डम्पिंग ग्राउंड मिळणे अवघड झाल्यानं इमारतीतच कचऱ्यावर प्रक्रिया करणं बंधनकारक असल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पालिका जागोजागी बॅनर, सूचनाफलक लावून जनजागृती करत आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या