Advertisement

पालिकेच्या 'सिटी ऑफ लॉस एंजिलिस' शाळेचं होणार नूतनीकरण

सिटी ऑफ लॉस एंजिलिस ही शाळा ३० वर्ष जुनी असून ती तीन मजली आहे. या शाळेचं बांधकाम आरसीसी फ्रेमचं असून ४३०१.७५ चौ.मी. इतकं बांधकाम क्षेत्रफळ आहे.

पालिकेच्या 'सिटी ऑफ लॉस एंजिलिस' शाळेचं होणार नूतनीकरण
SHARES

मुंबईतील महापालिका शालेय इमारतींत सुधारणा करून त्यांचे नूतनीकरण करण्यात येत आहे. त्यानुसार येत्या काही दिवसात मुंबई महापालिकेच्या 'सिटी ऑफ लॉस एंजिलिस' हा शाळेची दुरस्ती करण्यात येणार आहे. जवळपास  ६.८३ कोटी रूपये खर्च करून शाळेची इमारत दुरूस्त करण्यात येणार असून यासाठी कंत्राटदाराची नियुक्तीही करण्यात आली आहे.


१ हजार विद्यार्थी 

सिटी ऑफ लॉस एंजिलिस ही शाळा ३० वर्ष जुनी असून ती तीन मजली आहे. या शाळेचं बांधकाम आरसीसी फ्रेमचं असून ४३०१.७५ चौ.मी. इतकं बांधकाम क्षेत्रफळ आहे. सध्या या शाळेत २१ वर्ग खोल्या, ३ कार्यालय, ४ कर्मचारी खोल्या तसंच विद्यार्थ्यांसाठी १ संगणक कक्ष, १ विज्ञान प्रयोगशाळा, १ व्हर्च्युअल क्लासरूम आणि वाचनालय आहे. या शाळेत १ हजार विद्यार्थी शिकत असून प्रत्येक मजल्यावर विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आहेत.


१८ महिन्यात काम

या दुरूस्तीच्या कामाअंतर्गत या शाळेच्या इमारतीच्या बाहेरील भागास व आतील भागात प्लास्टर करण्यात येणार आहे. शाळेच्या इमारतीचे खांब मायक्रो काँक्रिटसह मजबूत करण्यात येणार अाहेत. तसंच पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्या बदलणं, दरवाजा-खिडक्या बदलणं, स्वच्छतागृहात सिरॅमिक टाईल्स बसवणं, छताची दुरूस्ती करण्यात येणार आहे. त्याशिवाय तीन मजली इमारतीची रंगरंगोटीही करण्यात येणार आहे.  दुरुस्ती कामासाठी मे. भारती कन्स्ट्रक्शन कंपनी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. वर्क ऑर्डर मिळाल्यापासून १८ महिन्यात काम पूर्ण करण्यात येणार आहे.हेही वाचा -

दप्तराचं ओझं कमी करण्याच्या आदेशाचं काय केलं? उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल

विद्यापीठांच्या विविध परीक्षांना आजपासून सुरुवात
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा