Advertisement

मुंबई महापालिका शाळांमध्ये आता केम्ब्रिजचा अभ्यासक्रम!


मुंबई महापालिका शाळांमध्ये आता केम्ब्रिजचा अभ्यासक्रम!
SHARES

मुंबई महापालिकेच्या शाळा आता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बनवण्यात येणार आहे. केम्ब्रिज विद्यापीठ आणि ब्रिटिश कौन्सिल या संस्थेच्या मदतीने एक समिती गठित करून महापालिका शाळांसाठी निवडक अभ्यासक्रम बनवून त्याद्वारे शिक्षण दिले जाणार आहे. राज्य शासनाच्या धोरणानुसार संपूर्ण राज्यातून प्राथमिक स्तरावर १०० शाळा निश्चित केल्या जाणार आहेत. या १०० शाळांपैकी मुंबईतल्या २६ महापालिका शाळा आहेत.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कामगिरीत देशात पहिल्या तीन क्रमांकात आणायचे उद्दिष्ट असून यासाठी राज्यातील शाळा आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या असाव्यात असे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार चालू शैक्षणिक वर्षात मुंबई महापालिकेच्या एकूण निवडक २६ शाळांची निश्चित केल्या आहेत.


समिती बनवणार अभ्यासक्रम

आंतरराष्ट्रीय स्तराच्या शिक्षणासाठी परिमंडळ स्तरावर विशेष कक्ष निर्माण करण्यात येणार असून केम्ब्रिज युनिव्हर्सिटी व ब्रिटिश कौन्सिल यांच्या मदतीने समिती गठित करण्यात येणार आहे. या समितीच्या वतीने शाळांसाठी एक अभ्यासक्रम बनवला जाणार आहे. या अभ्यासक्रमानुसार शाळांमध्ये शिक्षण दिले जाईल.

केम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या मदतीने आवश्यकतेनुसार सध्याच्या अभ्यासक्रमामध्ये बदल करणे, प्रत्येक साहित्य मराठी व उर्दू भाषेत उपलब्ध करून देणे, निवडलेल्या शाळांच्या शिक्षकांना प्रशिक्षण देणे बंधनकारक राहणार आहे. यामुळे या शाळेतील प्रत्येक मुलाला आंतरराष्ट्रीय चाचणीमध्ये सरासरी ५०० गुण मिळावेत, हाच यामागचा उद्देश असल्याचे महापालिकेच्या शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

शाळा आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पोहोचली की नाही, हे मुलांच्या मूल्यांकनाद्वारे निश्चित केले जाणार आहे. त्यासाठी शाळांतील मुलांचे मूल्यांकन हे केम्ब्रिज युनिव्हर्सिटीने सुचवल्यानुसारच केले जाणार आहे.



हेही वाचा

महापालिका शाळांतील विद्यार्थी खाणार चणे, शेंगदाणे


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा