Advertisement

शाळांमधल्या खासगी स्पर्धा परीक्षांसाठी 'या' अटी अनिवार्य


शाळांमधल्या खासगी स्पर्धा परीक्षांसाठी 'या' अटी अनिवार्य
SHARES

राज्यभरातल्या शाळांमध्ये होणाऱ्या खासगी परीक्षांवर शिक्षण विभागानं जानेवारी महिन्यात बंदी घातली होती. पण आता ही बंदी उठवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र, या परीक्षांसाठी काही खास धोरणं तयार करण्यात आली आहेत.

विद्यार्थ्यांवर पडणारा ताण आणि पालकांची होणारी लूट थांबावण्यासाठी शाळेत घेतल्या जाणाऱ्या अवांतर खासगी टॅलेंट सर्च परीक्षांवर बंदी घालण्यात आली होती. या परीक्षेच्या नावाखाली पालकांची लूट होत असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे या स्पर्धा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, अनेक शाळा आणि संस्थांनी या निर्णयाला विरोध करत काही खासगी परीक्षांचं महत्त्व सांगितलं. त्यानुसार शिक्षण विभागाने यात बदल केले.


या अटी अनिवार्य...

  • वाचनाला प्रोत्साहन देणारी परीक्षा असावी
  • राष्ट्रपुरुषांची माहिती देणारी परीक्षा असावी
  • परीक्षा घेण्यापूर्वी त्या संस्थेने तीन वर्षांचा ताळेबंद निबंधक कार्यालयात सादर करणे बंधनकारक
  • या परीक्षा विद्यार्थ्यांवर बंधनकारक असू नयेत
  • शाळांवर परीक्षांचे आयोजन बंधनकारक नाही
  • या परीक्षांमधून नफा कमावणे हा उद्देश असू नयेहेही वाचा - 

पालक म्हणतात 'फी वाढ नकोच'!

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच फी वाढ


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा