महापालिकेच्या शिक्षणावर 'प्रजा'चे ताशेरे

मुंबई - प्रजा या संस्थेनं आपला शिक्षण विषयक वार्षिक अहवाल जाहीर केलाय. या अहवालात अनेक धक्कादायक खुलासे आहेत. महापालिकेच्या मराठीसह इतर माध्यमांतील शाळांतून विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गळती सुरूच आहे.

5 वर्षांत 51 हजार विद्यार्थ्यांची गळती

63 टक्के पालिका शाळांचा दर्जा खालावला

2015-16 मध्ये गळतीचं प्रमाण शंभरी 15

55 टक्के पालकांची पालिकेच्या शिक्षणावर नाराजी

खासगी इंग्रजी शाळांना पालकांची मराठीऐवजी पसंती

प्रजा फाउंडेशननं अहवाल जाहीर केला आणि विरोधकांनी आरोपांच्या फैरी झाडायला सुरुवात केली. सत्ताधारी नगरसेवकांनाच शिक्षणाची गरज आहे, असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सांवत यांनी लगावला. तर, सत्ताधारी शिवसेना यासंदर्भात विशेष प्रयत्न करतेय, असा दावा शिवसेनेचा दावा आहे. राजकारणी दावा करत असले, तरी प्रजा संस्थेचा हा अहवाल नक्कीच डोळ्यात अंजन घालणारा आहे.

 

Loading Comments