Advertisement

पालिका शाळांचं रूप पालटणार


पालिका शाळांचं रूप पालटणार
SHARES

येत्या शैक्षणिक वर्षापासून पालिकेच्या शाळांचं रंगरूप बदलणार आहे. पालिकेच्या परळ भोईवाडा, कामाठीपूरा, एम.एच.बी या शाळांचा आता कायापालट होणार आहे. या शाळा आता खासगी शाळांप्रमाणे दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी पालिकेने शाळा हायटेक होणार असं जाहीर केलं होतं. त्याच धर्तीवर हे काम हाती घेण्यात येणार आहे.

पालिकेच्या शाळांची अवस्था तितकीशी बरी नाही, त्याचप्रमाणे पालिकेच्या शाळांमधील शिकवणीचा दर्जाही दिवसेंदिवस घसरत चालला आहे. यामुळे पालक पालिकांच्या शाळांऐवजी खासगी शाळांना पसंती देताना दिसत आहेत. याला आळा घालण्यासाठी पालिकेने शाळांच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतलं आहे. पालिकेच्या शाळा आकर्षक दिसण्यासाठी शाळांच्या रंगकामावर विशेष भर देण्यात आला आहे.

पहिल्यांदाच वर्गात व्हर्च्यूअल क्लासरूमद्वारे शिक्षण देण्यात येणार आहे. मागील वर्षी एकूण 98 इमारतींची 411 कोटींची कामे करण्यास सुरूवात करण्यात आली होती. त्यापैकी 19 कामे 2017 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट पालिकेकडून ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची गळती थांबावी, खासगी शाळेत मूलं न जाता पालिकेच्या शाळेत मुलांनी यावं यासाठी शाळेचं रंगरूप पालटण्याचा निर्णय घेतल्याचं शिक्षण समितीच्या अध्यक्षा शुभदा गुडेकर यांनी सांगितलं आहे. शाळांची पहाणी करण्यापासून शाळांचा दर्जा राखण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या आहेत. पालिकेच्या शाळांच्या इमारती सगळ्यांसाठी रोल मॉडेल होतील, पालिकेच्या शाळेबद्दलचा गैरसमज दूर होईल असा विश्वासही शुभदा गुडेकर यांनी व्यक्त केला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा