Advertisement

महापालिकेच्या सर्वच शाळा होणार 'द्विभाषिक', गणित, विज्ञानाचे धडे इंग्रजीतून


महापालिकेच्या सर्वच शाळा होणार 'द्विभाषिक', गणित, विज्ञानाचे धडे इंग्रजीतून
SHARES

येत्या शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमाच्या पहिलीच्या वर्गांमध्ये मातृभाषेसह इंग्रजीला प्रथम भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय महापालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे सेमी इंग्लिश शाळेनंतर आता महापालिकेच्या सर्वच शाळा पूर्णपणे द्विभाषिक होणार आहेत. या द्विभाषिक शाळांमध्ये मातृभाषेतून शिक्षण देण्यासोबत विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान हे दोन विषय इंग्रजीतून शिकवले जाणार आहेत.

सेमी इंग्लिशच्या माध्यमातून सध्या महापालिकेच्या शाळांमधील मुलांना इंग्रजीचे धडे देण्यात येत आहेत. पण नव्या निर्णयानुसार पुढील शैक्षणिक वर्षांपासून महापालिकेच्या मराठी माध्यमांसह सर्व शाळांमध्ये इंग्रजी भाषा देखील शिकवण्यात येणार आहे.


म्हणून सेमी इंग्रजी

इंग्रजी शाळांच्या वाढत्या प्रमाणामुळे मुंबई महापालिकेच्या शाळांना गळती लागली आहे. ही गळती थांबवण्यासाठी शालेय धोरणातही बदल केला जात आहे. व्यवहारात इंग्रजी भाषेचं महत्त्व लक्षात घेता पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवण्यालाच प्राधान्य देत आहेत.


किती सेमी इंग्रजी वर्ग?

त्यामुळे महापालिकेच्या इंग्रजी शाळांमधील पटसंख्या वगळता इतर माध्यमाच्या शाळांमधील पटसंख्या झपाट्याने कमी होत आहे. महापालिकेने मराठीसह इतर प्रादेशिक माध्यमांच्या शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरु केले आहेत. महापालिकेने सन २०१३-१४ पासून आतापर्यंत ७३२ शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरु केले आहेत.


मराठी शाळा टिकाव्यात

महापालिका शाळांतील विद्यार्थी इंग्रजी माध्यमांकडे वळू नये व मराठी शाळा टिकून राहाव्यात यासाठीच मराठीबरोबरच गणित व विज्ञान हे विषय इंग्रजीतून शिकण्यात येणार असल्याचं, शिक्षण विभागाने स्पष्ट केलं आहे.


मुंबईतील बहुतांश मराठी माध्यमांच्या शाळांची स्थिती चिंताजनक आहे. पालकांनी मराठी शाळांमध्ये टाकलेल्या मुलांनाही इंग्रजी शिकता यावं, या उद्देशाने त्यांना पहिलीपासून इंग्रजीसहित गणित व विज्ञान हे दोन विषय इंग्रजीतून शिकवण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची मराठी आणि इंग्रजी भाषा पक्की होईल.
- महेश पालकर, शिक्षणाधिकारी



हेही वाचा-

'मराठी शाळा टिकवण्यासाठी राजाश्रय आणि लोकाश्रयाची गरज'


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा