Advertisement

१०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरण्यास लागणारे विलंब शुल्क माफ

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी १०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

१०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरण्यास लागणारे विलंब शुल्क माफ
SHARES

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी १०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ‘कुठलेही विलंब शुल्क न भरता इयत्ता १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या लेखी परीक्षा सुरू होण्याच्या अगोदरच्या दिवसापर्यंत परीक्षासाठीचे ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याची मुभा देण्यात आली आहे’, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

परीक्षा आवेदनपत्र भरण्यासाठी इयत्ता १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांना मुदतीनंतर विलंब फी भरावी लागत होती. मात्र सध्याची आव्हानात्मक परिस्थिती पाहता यावर्षी मुदतीनंतर फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब फी आकारण्यात येणार नसल्याची घोषणा वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत केली.

तांत्रिक बाबींमुळे कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल. काही गावांमध्ये इंटरनेटची सुविधा नसल्यामुळे परीक्षेचा अर्ज भरण्यात अडचणी येत असल्याची माहिती काही मान्यवर सदस्यांनी चर्चेदरम्यान पुरवली, असं गायकवाड यांनी सांगितलं.

शाळेच्या संपर्कात नसलेल्या विद्यार्थ्यांना संपर्क करून परीक्षा फॉर्म भरून घेण्याबाबत @msbshe मार्फत सर्व शाळा, कॉलेजना कळवण्यात येईल. तसंच जाहीर प्रसिद्धी देण्यासाठी वर्तमान पत्रांद्वारे कळवण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.

राज्यात १०वी आणि १२वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. १०वीची परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल दरम्यान होणार आहे. तर बारावीची परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान होणार आहे.



हेही वाचा

...नाहीतर महाराष्ट्रातल्या शाळा पुन्हा बंद, वर्षा गायकवाड यांचा इशारा

दहावी, बारावी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, 'इथं' तपासा तारखा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा