Advertisement

दहावी, बारावी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, 'इथं' तपासा तारखा

उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (HSC) आणि माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

दहावी, बारावी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, 'इथं' तपासा तारखा
SHARES

उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (HSC) आणि माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली होती.

४ मार्च २०२२ ते ७ एप्रिल २०२२ या दरम्यान बारावीची लेखी परीक्षा होणार असल्याचं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं. तर १५ मार्च २०२२ ते १८ एप्रिल २०२२ यादरम्यान दहावीची परीक्षा होणार आहे. दोन्ही परीक्षा प्रत्यक्ष केंद्रावरच म्हणजेच, ऑफलाइन पद्धतीनं होणार आहेत.

कोरोना महामारीमुळे २५ टक्केंचा अभ्यास याआधीच कपात करण्यात आला आहे. उर्वरित अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नच परीक्षेत विचारले जातील, असं बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. अखेर आज दहावी-बारवी परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.


दहावी बारवी परीक्षेचा सविस्तर वेळापत्रक जाहीर

 • १५ मार्च : प्रथम भाषा (मराठी, हिंदी उर्दू, गुजराती आणि इतर प्रथम भाषा)
 • १६ मार्च : द्वितीय वा तृतीय भाषा
 • १९ मार्च : इंग्रजी
 • २१ मार्च : हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)
 • २२ मार्च : संस्कृत, उर्दू ,गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय (द्वितीय किंवा तृतीय भाषा)
 • २४ मार्च : गणित भाग - १
 • २६ मार्च : गणित भाग २
 • २८ मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १
 • ३० मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २
 • १ एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर १
 • ४ एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर २

प्रात्यक्षिक,श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांची परीक्षा (प्रचलित पद्धतीनुसार) बारावी, दहावीसाठी अनुक्रमे १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ आणि २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ या कालावधीत पार पडेल.

दहावी आणि बारावीचे वेळापत्रक तपासण्यासाठी या https://mahahsscboard.in/ वेबसाईटला भेट द्या. 

 


हेही वाचा

महापालिकेच्या ११ शाळांना सीबीएसईची मान्यता

शाळा पुन्हा उघडल्या, मात्र स्कूल बसेसची कमतरता

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा