'माऊंट मेरी' शाळेला बोर्डाने पाठवली नोटीस


SHARE

बारावी पेपर फुटी प्रकरणात विरारच्या 'माऊंट मेरी' स्कूलला बोर्डाने नोटीस पाठवली आहे. 12 वीचा मराठीचा पेपर 'माऊंट मेरी' स्कूलमधून फुटल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी मुख्याध्यापक, मुख्य लिपीक याच्यासह खासगी क्लासच्या दोघांना अटक केली होती. विशेष म्हणजे एका कात्रीमुळे गुन्हेगारांचा शोध लागला होता. जी प्रश्नपत्रिका व्हायरल झाली होती, त्या प्रश्नपत्रिकेचा फोटो काढताना त्यावर पेपरवेट म्हणून एक कात्री ठेवण्यात आली होती. या कात्रीचा शोध घेतला असता ती 'माऊंट मेरी' शाळेतील मुख्याध्यापक कक्षात आढळून आली. दरम्यान या प्रकरणात आरोपींना 18 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.


हेही पहा - 

प्रश्नपत्रिका व्हायरल करणाऱ्यांना बसणार चाप, समितीची स्थापना


आता या शाळेला पेपर फुटी प्रकरणी शिक्षण विभागाने नोटीस बजावली आहे. नोटिशीला योग्य उत्तर न मिळाल्यास शाळेची मान्यता रद्द करायची की, शाळेवर कारवाई करायची हे ठरवले जाईल असे मुंबई विभागाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी सांगितले.


हेही वाचा

बारावीच्या पेपरफुटीप्रकरणी तीन विद्यार्थ्यांना पकडलं


संबंधित विषय
ताज्या बातम्या