Advertisement

बारावीच्या पेपरफुटीप्रकरणी तीन विद्यार्थ्यांना पकडलं


बारावीच्या पेपरफुटीप्रकरणी तीन विद्यार्थ्यांना पकडलं
SHARES

मुंबई - बारावीच्या पेपर फुटीप्रकरणी शुक्रवारी तीन विद्यार्थ्यांना पकडण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार परीक्षा सुरू होण्यापूर्वी यातील दोघांच्या मोबाइलवर आधीच गणिताचा पेपर आला होता. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचे मोबाइल तपासले असता प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या हवाली करण्यात आलं.

यातील दोन विद्यार्थी कांदिवलीतल्या डॉ. टी. आर. नरवणे महाविद्यालय तर एकजण बालभारती शाळा या परीक्षा केंद्रावर तीन मिनीट उशिरा पोहचला होता. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी मोबाइल तपासले असता त्याच्या मोबाइलमध्ये प्रश्नपत्रिका सापडली. त्यानंतर त्याला पोलिसांकडे देण्यात आले. यामधील पकडले गेलेल्या एका विद्यार्थ्याचे वडील छोटेलाल मधुकर यांनी सांगितलं की, आपल्या मुलाची चूक नसून त्याच्या मोबाइलवर व्हॉट्सअॅपवरून कुणीतरी ती प्रश्नपत्रिका पाठवली होती. तसंच तपास अधिकाऱ्यांनी पेपर लीक करणाऱ्यांवरही कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.

यातील पकडण्यात आलेल्या विद्यार्थ्याच्या आईने सांगितलं की, बालभारती महाविद्यालयात तो फक्त तीन मिनीटं उशिरा पोहचला होता. तसंच त्याच्या मोबाइलवर मिळालेली प्रश्नपत्रिका ही यंदाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेपेक्षा वेगळी आहे. तसंच बोर्डाच्या तपास अधिकाऱ्यांनी ज्यांचा पेपर फुटीप्रकणात समावेश आहे त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. यात शाळा प्रशासनाची चूक असल्याचं परीक्षा केंद्रात आलेल्या इतर विद्यार्थ्यांनी सांगितलं. जर शाळेने परीक्षा केंद्रात मोबाइल आणण्यावर बंदी घातली असती तर असं झालंच नसतं असंही त्या विद्यार्थांनी सांगितलं. या पेपर फुटीप्रकरणात तीन विद्यार्थ्यांविरोधात तक्रार दाखल झाली असून तपास सुरू असल्याची माहिती कांदिवली पोलिसांनी दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा