Advertisement

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नवीन अभ्यासक्रम फायदेशीर


विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नवीन अभ्यासक्रम फायदेशीर
SHARES

अभ्यासक्रम बदलल्याने नवीन पाठ्यपुस्तक कधी मिळणार या प्रतिक्षेत असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रतीक्षा अखेर संपली आहे. ही पुस्तकं बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. या पुस्तकांबरोबर प्रत्येक विषयाची मूल्यमापन पद्धती कशी असेल याबाबतचा तपशील देणारी हस्तपुस्तिकाही या पुस्तकांसोबत उपलब्ध करून देण्यात आली आहे. 'या पुस्तिकेमुळे विद्यार्थ्यांचं मूल्यमापन कसं करावं? याचा तपशील समजणार आहे आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी होणार आहे', असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला.नवीन अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकाचे प्रकाशन

महाराष्ट्र राज्य पाठ्युपस्तक निर्मिती आणि संशोधन मंडळ (बालभारती) निर्मित इयत्ता दहावीच्या सर्व माध्यमांच्या नवीन अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकाचे प्रकाशन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते दादर येथील शिवाजी मंदिरात करण्यात आलं.

राज्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने अभ्यासमंडळातील विशेष तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत.


विद्यार्थ्यांना कसा होणार फायदा?

नवीन अभ्यासक्रमाच्या प्रत्येक पुस्तकातील धड्यांमध्ये क्यूआर कोडचा समावेश करण्यात आला असून या डिजिटल पद्धतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक आणि सविस्तर माहिती इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकेल, असंही तावडे यांनी स्पष्ट केलं.

बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांबरोबर या पुस्तिकेच्या आधारे विद्यार्थ्यांना विषयाची ओळख, विषययोजना, कृतीपत्रिका, प्रश्नपत्रिका याचं स्वरुप आणि निर्मितीचे निकष आणि याआधारे विद्यार्थ्यांना मूल्यामापन कसं करावे? याचा तपशील समजणार आहे, असेही तावडे यांनी सांगितलं.


हेही वाचा -

दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली, पुस्तकं विक्रीसाठी उपलब्ध

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा