विद्यार्थ्यांना लाइट, कॅमेरा, अॅक्शनचे धडे


  • विद्यार्थ्यांना लाइट, कॅमेरा, अॅक्शनचे धडे
  • विद्यार्थ्यांना लाइट, कॅमेरा, अॅक्शनचे धडे
SHARE

भायखळा - पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना लाइट, कॅमेरा आणि अॅक्शनचे धडे देण्यात आले. युक्ती फाऊंडेशन आणि सोशल अॅक्टिव्हिटिज इंटिग्रेशन यांच्या ‘प्रोजेक्ट इंद्रधनू’च्या माध्यमातून साई संस्थेच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला. समाजापासून वंचित घटकांमधील मुलांमध्ये विविध करियर क्षेत्रातील आवड निर्माण करण्यासाठी आणि त्यांचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी ही संस्था गेल्या 30 वर्षापासून अशा प्रकारचे शैक्षणिक उपक्रम राबवत असते. या कार्यक्रमाला प्रसिद्ध दिग्दर्शक प्रशांत गिरकर यांनी मुलांना लाईट कॅमेरा आणि अॅक्शन या पडद्यामागच्या दुनियेबद्दल मुलांना मार्गदर्शन केलं. अभिनय कसा करावा, त्या मागे काय आणि कशी मेहनत घावी तसेच रिल आणि रिअल या दोन्हीमधील वस्तूस्थिती या बद्दलही गिरकर यांनी मार्गदर्शन केलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या