Advertisement

सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारीनंतर होणार

सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा आता फेब्रुवारी २०२१ नंतरच होणार आहेत. या परिक्षा फेब्रुवारीपर्यंत होणार नसल्याची घोषणा रमेश पोखरियाल यांनी केली.

सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारीनंतर होणार
SHARES

सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा आता फेब्रुवारी २०२१ नंतरच होणार आहेत. या परिक्षा फेब्रुवारीपर्यंत होणार नसल्याची घोषणा रमेश पोखरियाल यांनी केली. 

रमेश पोखरियाल म्हणाले की, सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करणे आणि विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रमोट करणं हे विद्यार्थ्यांना भविष्यात अडचणीचे आणणार ठरेल. त्यामुळे १० वी आणि १२ वीच्या परीक्षा रद्द न करता पुढे ढकलल्या जातील.  जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या परीक्षा फेब्रुवारीनंतर होतील.

कोरोना मुळे अनेक देशांनी संपूर्ण शैक्षणिक वर्ष रद्द केले. मात्र, आपल्या देशातील शिक्षकांनी सातत्यानं काम केले. त्यांनी कोरोना काळात एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले नाही. शिक्षकांनी कोरोना योद्ध्यांसारखे काम करुन ३३ कोटी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले, असं पोखरियाल म्हणाले.

हेही वाचा -

राजहट्ट व बालहट्टासाठीच मेट्रो कारशेडची जागा बदलली- किरीट सोमैय्या

ब्रिटन, आखाती देशांतून येणाऱ्या प्रवाशांना सक्तीने क्वारंटाइन, मुंबई महापालिकेचा निर्णय

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा