Advertisement

अखेर सीबीएसई बोर्डच्या १०वी व १२वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर


अखेर सीबीएसई बोर्डच्या १०वी व १२वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर
SHARES

सीबीएसई बोर्डच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या १०वी आणि १२वी परीक्षांच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. येत्या ४ मे ते ११ जून या कालावधीत या परीक्षा होणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक बोर्डच्या cbse.gov.in या संकेत स्थळावर जाहीर करण्यात आले असून विद्यार्थी आणि पालकांना त्या ठिकाणी परीक्षेसंबंधी सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.

cbse.gov.in या वेबसाइटवर भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी १०वी आणि १२वी अशा २ पर्यायापैकी एका पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर स्क्रीनवर संपूर्ण माहिती दिसू शकेल. शिवाय, माहितीचा पीडीएफ फॉरमॅटमध्येही डाऊनलोड करणे शक्य होणार आहे. देशभरातील विविध राज्यातील १०वी आणि १२वीसाठी सीबीएसई बोर्डच्यावतीनं परीक्षा घेण्यात येतात. 

मंगळवारी वेळापत्रकाची घोषणा करण्याता आली आहे. त्यानुसार १०वीच्या परीक्षा या ४ मे ते १० जून दरम्यान तर १२वीची परीक्षा ही ४ मे ते ११ जून या दरम्यान होणार आहे.

ऑफलाईन होणार परीक्षा

सीबीएसई बोर्डच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या १०वी आणि १२वीसाठीच्या या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. कोणताही विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहू नये म्हणून ही या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. पण हे करताना कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे. त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग सॅनिटायझरचा वापर, मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.

प्रॅक्टिकल परीक्षा मार्चमध्ये सीबीएसईच्यावतीनं आधीच जाहीर करण्यात आलं आहे की प्रॅक्टिकल परीक्षा या मार्चमध्ये घेण्यात येतील. त्या वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या दिवशी घेण्यात येतील असंही सांगण्यात आलं आहे. सीबीएसई परीक्षांचा निकाल हा १५ जुलैपर्यंत लागण्याची शक्यता आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा