CBSE दहावीचा निकाल मंगळवारी


SHARE

केंद्रीय माध्यमिक शिक्षण (सीबीएसई) बोर्डाचा बारावीचा निकाल शनिवारी २६ मे रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर लगेचच मंगळवारी २९ मे रोजी सीबीएसई बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात येईल. २९ मे रोजी संध्याकाळी ४ वाजता हा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरुप यांनी दिली.


निकालासाठी विशेष सोय

सीबीएसई बोर्डाचा बारावीप्रमाणे दहावीचा निकालही ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना cbseresults.nic.in, cbse.nic.in आणि results.nic.in या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. दरम्यान सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर निकालाच्या दिवशी येणारा ताण लक्षात घेता मोबाईल मेसेज, कॉलवर किंवा शाळेच्या वेबसाईटवरही निकाल पाहता येईल, अशी सोय सीबीएसई बोर्डाद्वारे करण्यात आली आहे.

यंदा दहावीच्या परीक्षा ५ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत घेण्यात आली होती. या परीक्षेकरता १६ लाख, ३८ हजार, ४२८ विद्यार्थी बसले होते.


हेही वाचा - 

सीबीएसई बोर्ड १२वीचा निकाल जाहीर, गाझियाबादची मेघना श्रीवास्तव देशात पहिली

आयसीएसईचा दहावी-बारावीचा निकाल सोमवारी

संबंधित विषय
ताज्या बातम्या