Advertisement

CBSE १०वी निकाल : चार विद्यार्थ्यांना ५०० पैकी ४९९ मार्क

यंदा पहिल्यांदाच ४ विद्यार्थ्यांनी देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. या चारही विद्यार्थ्यांनी ५०० पैकी ४९९ गुणांची कमाई केली आहे. यामध्ये गुडगावचा प्रखर मित्तल, शामलीची नंदिनी गर्ग, कोचीनची श्रीलक्ष्मी आणि बिजनौरची रिमझिम अगरवाल यांचा समावेश आहे. देशात टॉप केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तीन विद्यार्थिनींचा समावेश आहे.

CBSE १०वी निकाल : चार विद्यार्थ्यांना ५०० पैकी ४९९ मार्क
SHARES

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने देशभरात घेतलेल्या १०वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. या परीक्षेमध्ये गुरगावच्या प्रखर मित्तलने बाजी मारली असून त्याने ५०० पैकी ४९९ गुण मिळवले आहेत. एकूण ४ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला असून चारही जणांना ४९९ मार्क मिळाले आहेत. यावर्षी जवळपास १६ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते.


४ विद्यार्थ्यांना पहिला क्रमांक

यंदा पहिल्यांदाच ४ विद्यार्थ्यांनी देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. या चारही विद्यार्थ्यांनी ५०० पैकी ४९९ गुणांची कमाई केली आहे. यामध्ये गुडगावचा प्रखर मित्तल, शामलीची नंदिनी गर्ग, कोचीनची श्रीलक्ष्मी आणि बिजनौरची रिमझिम अगरवाल यांचा समावेश आहे. देशात टॉप केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तीन विद्यार्थिनींचा समावेश आहे.


तिरूअनंतपुरम सर्वात भारी!

या परीक्षेमध्ये देशभरात ८६.७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, यामध्ये तिरूअनंतपुरममध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण सर्वात जास्त आहे. तिरूअनंतपुरममध्ये ९९.६० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दिव्यांगांच्या श्रेणीमध्ये गुडगावच्या अनुष्का पांडाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.


कुठे पहाल निकाल?

cbse.nic.in, cbseresults.nic.in, results.nic.in, Microsoft SMS Organizer, www.google.com, www.bing.com या वेबसाईट्सवर आणि UMANG या मोबाईल अॅप्लिकेशनवर तुम्हाला निकाल पहाता येणार आहेत. निकाल पहाण्यासाठी तुम्हाला तुमचे परीक्षा प्रवेशपत्र अर्थात हॉलतिकीट सोबत ठेवावं लागणार आहे. त्यातली माहिती वेबसाईट आणि अॅप्लिकेशनवर भरल्यानंतरच निकाल पहाता येणार आहेत.


'असा' पाहता येईल निकाल

दहावीच्या सीबीएसई परीक्षेकरिता देशभरातून १६ लाख ३८ हजार ४२८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. याशिवाय मेसेजद्वारेही तुम्हाला निकाल पाहता येईल. दहावीच्या निकालासाठी मेसेज बॉक्समध्ये जा. तिथे cbse10 स्पेस rollno स्पेस sch no स्पेस center no स्पेस लिहा आणि ७७३८२९९८९९ या नंबरवर पाठवा.


  • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईची अधिकृत वेबसाईट cbse.nic.in वर क्लिक करा
    इथे तुम्हाला १० वी आणि १२ वी असे पर्याय दिसतील, त्यापैकी तुम्हाला कोणता निकाल पाहायचा आहे तो निवडा.
  • १० वीचा निकाल पाहण्यासाठी CBSE 10th result 2018 वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा परीक्षेचा बैठक क्रमांक, स्कूल क्रमांक, सेंटर क्रमांक तसेच जन्मतारीख टाकल्यानंतर दहावीचा निकाल दिसेल.
  • तसेच पुढील वापरासाठी तुम्ही निकालाची प्रत डाऊनलोड करु शकता.


पेपर लीकमुळे निकालाबाबत चर्चा

याआधी सीबीएसईने २६ मे रोजी १२वीचे निकाल जाहीर केले होते. यावर्षी सीबीएसईच्या परीक्षांवरून मोठा वाद निर्माण झाला होता. १०वी आणि १२वीचे अनुक्रमे गणित आणि अर्थशास्त्र हे पेपर लीक झाल्यामुळे काही भागांमध्ये पुन्हा परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर या परीक्षांचे निकाल वेळेवर लागणार की नाही? याविषयी शंका उपस्थित केल्या जात होत्या. मात्र, सीबीएसईने वेळेवर निकाल जाहीर करून सर्वच विद्यार्थ्यांना सुखद धक्का दिला आहे.


मेघना श्रीवास्तव १२वीच्या परीक्षेत देशात पहिली

नुकतेच सीबीएसईच्या १२वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये गाझियाबादच्या मेघना श्रीवास्तवने देशात पहिला क्रमांक पटकावला होता. मेघनाला ५०० पैकी ४९९ मार्क्स मिळाले होते.



हेही वाचा-

फाकेहाला परीक्षेची परवानगी नाहीच



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा