Advertisement

CBSE: इयत्ता १०वी, १२वीचे अंतर्गत मूल्यांकन २ मार्चपासून सुरू होणार

प्रात्यक्षिक परीक्षा तसेच प्रोजेक्ट मूल्यांकनासाठी बाह्य निरीक्षकांची नियुक्ती अपेक्षित आहे.

CBSE: इयत्ता १०वी, १२वीचे अंतर्गत मूल्यांकन २ मार्चपासून सुरू होणार
SHARES

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) च्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक, प्रोजेक्ट आणि इयत्ता १० आणि १२वी मधील विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन बुधवार, २ मार्चपासून सुरू होईल.

असं नोंदवलं गेलं आहे की, इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाद्वारे नियुक्त केलेले बाह्य परीक्षक असतील. दुसरीकडे, प्रात्यक्षिक परीक्षा तसंच प्रकल्प मूल्यांकनासाठी बाह्य निरीक्षकांची नियुक्ती अपेक्षित आहे.

त्याचप्रमाणे, इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक आणि प्रकल्प मूल्यमापन शाळेनं नियुक्त केलेल्या अंतर्गत परीक्षकाद्वारे केलं जाईल. त्याचबरोबर हे गुण बोर्डाच्या वेबसाइटवर टाकले जातील.

दुसरीकडे, खाजगी उमेदवारांसाठी, स्वतंत्र प्रात्यक्षिक, प्रोजेक्टस आणि अंतर्गत मूल्यांकन होणार नाही. त्यांच्यासाठी, बोर्डानं घेतलेल्या थिअरी परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर गुण एकत्रित केले जातील.

वर्णनांच्या आधारे, COVID-19 प्रोटोकॉल विचारात घेऊन, विद्यार्थ्यांना जवळपास २० बॅचमध्ये विभागले जाईल. याशिवाय, प्रात्यक्षिक, प्रोजेक्ट आणि अंतर्गत मूल्यांकन शेवटच्या परीक्षेच्या तारखेच्या १० दिवस आधी पूर्ण करणे आवश्यक आहे.

तपशीलवार वेळापत्रकाची प्रतीक्षा असताना, २६ एप्रिलपासून लेखी परीक्षा सुरू होतील. CBSE ग्रेड १० वी आणि १२ वीसाठी टर्म २ बोर्ड परीक्षा २६ एप्रिल नंतर ऑफलाइन पद्धतीनं परीक्षा केंद्रांवर आयोजित केली जाईल.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा