Advertisement

CBSE विद्यार्थ्यांना मिळणार घराजवळील केंद्र

प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या घराच्या जवळच परीक्षा केंद्र मिळावं यासाठी 'हा' निर्णय घेण्यात आला आहे.

CBSE विद्यार्थ्यांना मिळणार घराजवळील केंद्र
SHARES

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) बोर्ड परीक्षांसाठी या वर्षी परीक्षा केंद्रांची संख्या दुप्पट वाढवली जाईल. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या घराच्या जवळच परीक्षा केंद्र मिळावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

बोर्डाचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी सांगितलं की, बोर्ड मोठ्या संख्येत सर्व सुविधा असलेल्या परीक्षा केंद्रांचा शोध घेत आहे. ज्या भागांत मे-जूनमध्ये भीषण उन्हाळा असतो, उन्हापासून बचावासाठी पुरेशा सुविधा असतील त्या शाळांतच परीक्षा केंद्र असेल. परीक्षेच्या तीन तासांत उष्ण वातावरणामुळे विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये हा त्यामागील हेतू आहे.

परीक्षा सुरू झाल्यानंतर १०व्या दिवशी म्हणजे १४ मेपासून पेपर तपासण्याची प्रक्रिया सुरू होईल. भारद्वाज यांनी सांगितलं की, बराच विचार करून परीक्षेचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. जास्त उन्हाळा असलेल्या भागांत परीक्षा केंद्रांबाबत कुठलीही सूचना किंवा आक्षेप आला तर सीबीएसई त्यावर गांभीर्यानं विचार केला जाईल.

तथापि, विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत. कोरोनानंतरच्या स्थितीत बोर्ड परीक्षांसाठी सीबीएसई स्टॅँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) तयार करत आहे. परीक्षा केंद्रांवर फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम लागू व्हावा यासाठी प्रत्येक वर्गात परीक्षार्थींची संख्या कमी केली जात आहे.



हेही वाचा

आॅनलाईन उपस्थितीवर विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती

राज्यभरातील काॅलेज १५ फेब्रुवारीपासून होणार सुरू

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा