इंजिनीअरिंग प्रवेशाच्या तारखा जाहीर

  Mumbai
  इंजिनीअरिंग प्रवेशाच्या तारखा जाहीर
  मुंबई  -  

  'सामुहिक प्रवेश परीक्षा' (सीईटी) सेलने इंजिनीअरिंग कॉलेजातील प्रवेशाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार कॉलेज प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी 5 जून रोजी सुरू होईल. तर 17 जून ही नोंदणीची अंतिम तारीख असेल.

  जे विद्यार्थी 'जेईई' मुख्य परीक्षेत यशस्वी ठरले आहेत, अशा विद्यार्थ्यांना नोंदणी करतेवेळी शुल्क भरावे लागतील. तर 'एमएच-सीईटी' प्रवेश परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी कुठलेही शुल्क भरावे लागणार नाही.

  'जेईई' मुख्यच्या सामान्य वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 800 रुपये नोंदणी शुल्क असेल आणि आरक्षित वर्गातील विद्यार्थ्यांना नोंदणी करताना 600 रुपये शुल्क भरावे लागतील.

  प्रवेशाची तारीख -
  - ऑनलाईन अर्ज - 5 जून पासून 17 जून 2017 पर्यंत
  - कागदपत्रांची तपासणी - 5 जून पासून 17 जून (सायं. 5 वाजेपर्यंत)
  - पहिली तात्पुरती गुणवत्ता यादी - 19 जून 2017, सायं. 5 वाजेपर्यंत
  - यादीवर हरकत नोंदवण्याची तारीख - 20 जून पासून 21 जून 2017, सायं. 5 वाजेपर्यंत
  - अंतिम गुणवत्ता यादी - 22 जून 2017
  - पहिल्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या फेरीची यादी - 22 जून 2017
  - विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन निश्चिती - 23 जून पासून 26 जून 2017 पर्यंत
  - पहिल्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया फेरीतील जागांचे तात्पुरते वाटप - 28 जून 2017, सायं. 5 वाजेपर्यंत
  - दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी - 5 जुलै 2017
  - विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन निश्चिती - 5 ते 8 जुलै 2017
  - दुसऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या फेरीतील जागांचे तात्पुरते वाटप -10 जुलै 2017
  - तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी - 5 जुलै 2017
  - विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन निश्चिती - 16 से 19 जुलाई 2017
  - तिसऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया फेरीतील जागांचे तात्पुरते वाटप - 21 जुलै 2017

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.