Advertisement

Maharashtra FYJC CET 2021: अकरावी सीईटीच्या अर्ज नोंदणीला सुरूवात

राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेची नोंदणी (FYJC CET 2021) सुरू झाली आहे.

Maharashtra FYJC CET 2021: अकरावी सीईटीच्या अर्ज नोंदणीला सुरूवात
File Image
SHARES

राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेची नोंदणी (FYJC CET 2021) मंगळवारपासून सुरू झाली. मात्र, पहिल्याच दिवशी परीक्षेसाठी नोंदणी करताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. बैठक क्रमांक आणि गुणपत्रिका यांचा ताळमेळ बसत नसल्याने गोंधळ झाला. 

कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्यात येऊन मूल्यांकनाच्या आधारे गुण देण्यात आले. त्यानंतर अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकरीता सीईटी परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही परीक्षा ऐच्छिक असणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयांना या परीक्षेचं आयोजन करावं लागणार आहे.

महाराष्ट्र अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना cet-mh-ssc.ac.in या लिंकवर सीईटीचा फाॅर्म भरावा लागेल. ही परीक्षा १०० गुणांची असेल. परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल. इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र या विषयांवर आधारीत परीक्षा असेल. २१ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत ही परीक्षा राज्यभरात कोविड १९ च्या नियमांसह घेण्यात येईल.

हेही वाचा- दोन वर्षांनी होणार शिक्षक पात्रता परीक्षा

‘असा’ भरा FYJC CET 2021 साठी फॉर्म  

- महाराष्ट्र FYJC CET 2021 ची अधिकृत वेबसाइट cet-mh-ssc.ac.in अशी आहे

- ड्रॉप डाऊन मेनूमध्ये जाऊन बोर्ड निवडा

- नाव, संपर्क क्रमांक, जन्म तारीख, पत्ता आणि शिक्षणाचं माध्यम अशी सर्व माहिती भरून नोंदणी करा

- जिल्हा व तालुका निवडून परीक्षा केंद्राचा तपशील निवडा

- फोटो, स्वाक्षरी, आयडी प्रूफ आणि दिव्यांग असल्यास त्यासंदर्भातील प्रमाणपत्र अपलोड करा

- खात्रीसाठी महाराष्ट्र एफवायजेसी सीईटी २०२१ च्या अर्जाची एक प्रिंट आऊट घ्या.

'कशी' असणार परीक्षा

  • ही परीक्षा राज्य मंडळाच्या दहावी अभ्यासक्रमावर आधारित असेल 
  • या परीक्षेसाठी १०० गुणांची प्रश्नपत्रिका असेल आणि परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल 
  • या परीक्षेची प्रश्नपत्रिका ८ माध्यमातून उपलब्ध होतील.
  • ही परीक्षा ऑफलाइन स्वरुपाची असेल आणि प्रश्नपत्रिकेत वस्तुनिष्ठ प्रकारचे बहुपर्यायी प्रश्न असतील.
  • सीईटी २०२१ च्या परीक्षेसाठीची अर्ज भरण्यासाठी सविस्तर सूचना मंडळाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. 
  • लिंकद्वारे महाराष्ट्र एफवायजेसी सीईटी फॉर्म भरण्याची सुविधा २६ जुलै २०२१ पर्यंत आहे
  • सीईटी २०२१ फॉर्म लिंकवर अधिक माहितीसाठी वेबसाइटवर तपासणी करत रहा

हेही वाचा- रत्नागिरी जिल्ह्यात उर्दू भवन उभारणार – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा