Advertisement

दोन वर्षांनी होणार शिक्षक पात्रता परीक्षा

२०१९ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे तर २०२० मध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा झाली नव्हती.

दोन वर्षांनी होणार शिक्षक पात्रता परीक्षा
SHARES

राज्यात दोन वर्षांनंतर शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी प्रवेश पात्रता परीक्षा (टीईटी) १५ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. 

२०१९ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे तर २०२० मध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा झाली नव्हती. शिक्षक पात्रता परीक्षेसाठी मान्यता द्यावी यासाठी राज्य सरकारकडे मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखांची घोषणा केली आहे.

याआधी २०१८-१९ मध्ये ही परीक्षा झाली होती. दरवर्षी साधारणपणे सात ते आठ लाख शिक्षक टीईटी देतात. दोन वर्षांनी परीक्षा होत असल्याने सुमारे १० लाख शिक्षक परीक्षा देतील असा अंदाज आहे. राज्यभरात २० ते २५ हजार प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या पदांवरील भरतीकरिता टीईटी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. 

टीईटीचे दोन पेपर घेण्यात येतात. महाराष्ट्रात टीईटी परीक्षेचं आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून करण्यात येतं. १ ली ते ५ वी आणि ६ वी ते ८ वी इयत्तेतील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. या दोन गटांसाठी ही परीक्षा घेण्यात येते.

टीईटीचा पेपर क्रमांक १ देण्यासाठी दोन वर्षांचा शिक्षणशास्त्र विषयातील डिप्लोमा म्हणजेच डीएड उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याशिवाय दुसऱ्या पेपरसाठी डी.एड उत्तीर्ण असणारे उमेदवार, पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक, शिक्षणशास्त्र विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

बालविकास आणि पेडॉगॉजी, मराठी आणि इंग्रजी भाषा , गणित यावर टीईटी परीक्षेच्या पेपर क्रमांक १ मध्ये प्रश्न विचारले जातात. तर बालविकास आणि पेडॉगॉजी, इंग्रजी आणि मराठी भाषा, गणित आणि सामाजिक शास्त्रे या विषयांवर आधारीत प्रश्न पेपर क्रमांक दोन मध्ये विचारले जातात.

टीईटी परीक्षेमध्ये ६० टक्क्यांहून अधिक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गुण उत्तीर्ण केले जातं. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी गुणांची मर्यादा ५५  टक्के निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या वेबसाईटवर येत्या काही दिवसांमध्ये अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होईल. टीईटी परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर केल जाईल.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा