Advertisement

11 मे ला होणार सीईटी परीक्षा


11 मे ला होणार सीईटी परीक्षा
SHARES

राज्य शासनाच्या वतीने अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षा गुरूवारी 11 मे रोजी घेण्यात येणार आहे. या प्रवेश परीक्षेसाठी एकूण 3 लाख 89 हजार 520 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यात 2 लाख 32 हजार 307 मुलं आणि 1 लाख 57 हजार 188 मुली आहेत. त्यापैकी 1 लाख 44 हजार 813 उमेदवार (पीसीएम), 95 हजार 545 उमेदवार (पीसीबी), आणि 1 लाख 49 हजार 162 उमेदवार (पीसीएमबी) ग्रुपसाठी परीक्षा देणार आहेत.

परीक्षेच्या कालावधीत परीक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात झेरॉक्स यंत्र, इंटरनेट सुविधा आणि दूरध्वनी केंद्र बंद ठेवण्यात येणार आहेत. परीक्षा संपेपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यास परीक्षा केंद्र सोडून जाता येणार नाही. परीक्षा केंद्रावर मोबाईल, लॅपटॉप, कॅल्क्युलेटर नेण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ही परीक्षा राज्यातील एकूण 1 हजार 110 परीक्षा उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने देण्यात आले आहेत. परीक्षेला येताना विद्यार्थ्यांनी काळ्या शाईचे बॉलपेन, अॅडमिट कार्ड, ओळखपत्र, बॅकेचे पासबुक, कॉलेजचे ओळख पत्र, आधार कार्ड सोबत ठेवणे अनिवार्य आहे. तसेच दिव्यांग उमेदवारांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र, तसेच लेखनिकांचे फोटो, ओळखपत्र परीक्षा केंद्रावर सोबत आणणे आवश्यक आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय