शिक्षकांचे एकदिवसीय आंदोलन

 Fort
शिक्षकांचे एकदिवसीय आंदोलन
शिक्षकांचे एकदिवसीय आंदोलन
शिक्षकांचे एकदिवसीय आंदोलन
शिक्षकांचे एकदिवसीय आंदोलन
शिक्षकांचे एकदिवसीय आंदोलन
See all

फोर्ट - मुंबई विद्यापिठातील संलग्न महाविद्यालयांमध्ये शिक्षकांना होणाऱ्या त्रासाविरोधात, तसेच वेळेत वेतन मिळावे या मागणीसाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील शिक्षकांनी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. हे सर्व शिक्षक शुक्रवारी एक दिवसीय उपोषणाला बसलेत. 'विद्यापिठाशी संलग्न विनाअनुदानित इंजिनियरींग कॉलेजमध्ये शिक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा शिक्षकांचे प्रश्न सरकारसमोर मांडलेत, मात्र त्यावर अद्याप तोडगा निघाला नाही. शिक्षकांना वेळेत पगार दिला जात नाही. विद्यापिठातील नियमांची सर्रास पायमल्ली केली जाते. एखाद्या शिक्षकाने तक्रार केल्यास शिक्षकांवर सतत नोकरी गमवण्याचा दबाव असतो. 2015 नंतर विद्यापिठातील एकाही मंडळांवर शिक्षकांचे प्रतिनिधी नेमले नाहीत. त्यामुळे कुलगुरु आणि त्यांच्या काही मोजक्या अधिकाऱ्यांच्या मर्जीनुसार कारभार सुरु असल्याची टीका बॉम्बे युनिव्हर्सिटी अॅण्ड कॉलेज टीचर युनियनचे सरचिटणीस डॉ. मधू परांजपे यांनी केली.

Loading Comments