सीबीएसई बोर्डाची हेल्पलाइन क्रमांक सेवा

सीबीएसईकडून मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांमध्ये करोना विषाणूसंबंधीची जनजागृती करण्याच्या उद्देशाने हे क्रमांक जारी केले आहेत.

सीबीएसई बोर्डाची हेल्पलाइन क्रमांक सेवा
SHARES

कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळं राज्य सरकारनं विविध उपयायोजना केल्या असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा व कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्यातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. अशातच आता केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळानं (CBSE) नवे हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. सीबीएसईकडून मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांमध्ये करोना विषाणूसंबंधीची जनजागृती करण्याच्या उद्देशाने हे क्रमांक जारी केले आहेत. 

सीबीएसईचे हे क्रमांक सकाळी १० ते दुपारी १.३० आणि दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. ही हेल्पलाइन प्रामुख्यानं जनजागृतीसाठी आहे. या क्रमांकांवर संपर्क साधून विद्यार्थी करोना व्हायरसपासून स्वत:चा आणि इतरांचा बचाव करण्याच्या उपाययोजना, मार्गदर्शक तत्वे यांची माहिती मिळवू शकतात. 

याव्यतिरिक्त सध्या घरीच असलेले हे विद्यार्थी अभ्यास कसा करायचा आहे याचीही माहिती या क्रमांकांवर मिळवू शकणार आहेत. सीबीएसईच्या नव्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांचं मानसिक समुपदेशनही सुरू राहणार आहे. विद्यार्थी ३१ मार्च पर्यंत १८००-११-८००४ या क्रमांकावर संपर्क साधू शकणार असून, हा क्रमांक टोल फ्री आहे.

सीबीएसई बोर्डाच्या १०वी, १२वीच्या परीक्षा ३१ मार्च २०२० पर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. ज्या विषयांच्या परीक्षा झाल्या आहेत, त्यांची उत्तरपत्रिका तपासणीचं कामही सध्या थांबलेलं आहे.

सीबीएसईचे नवे हेल्पलाइन क्रमांक

  • 9899991274
  • 8826635511
  • 9717675196
  • 9999814589

(वेळ - सकाळी १० ते दुपारी १.३०)


  • 9811892424
  • 9899032914
  • 9599678947
  • 7678455217
  • 7210526621

(वेळ - दुपारी २ ते सायंकाळी ५)

 


हेही वाचा -

अत्यावश्यक प्रवास मोफत करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी

संचारबंदीचा गुढीपाडव्याच्या बाजाराला फटकासंबंधित विषय