Advertisement

पंजाबमधून १६५ विद्यार्थ्यांची घरवापसी

लाॅकडाऊनमुळे पंजाबच्या लव्हली युनिव्हर्सिटीत अडकलेल्या महाराष्ट्रातील १६५ विद्यार्थ्यांना मंगळवारी सुखरूप राज्यात आणण्यात आलं. यातील १५ विद्यार्थी हे मुंबई परिसरातील आहेत.

पंजाबमधून १६५ विद्यार्थ्यांची घरवापसी
SHARES

लाॅकडाऊनमुळे पंजाबच्या लव्हली युनिव्हर्सिटीत अडकलेल्या महाराष्ट्रातील १६५ विद्यार्थ्यांना मंगळवारी सुखरूप राज्यात आणण्यात आलं. यातील १५ विद्यार्थी हे मुंबई परिसरातील आहेत. या विद्यार्थ्यांनी आपल्या घरी परतल्यावर प्रशासनाने कोरोना संदर्भात दिलेल्या फिजिकल डिस्टन्ससह सर्व नियमांचे पालन करावं, असं आवाहन नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केलं. याआधी राजस्थानच्या कोटा शहरात अडकलेल्या १८०० विद्यार्थ्यांना राज्य शासनाने महाराष्ट्रात परत आणलं होतं.

हेही वाचा- कोरोनामुळे झोपडपट्ट्यांमधील मृत्यूचं प्रमाण ६० टक्के 

सुखरूप महाराष्ट्रात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये पंजाबच्या लव्हली युनिव्हर्सिटीत महाराष्ट्रातील १६५ विद्यार्थी अडकले होते. वैद्यकीय, कृषी, मॅनजमेंट, पीएचडी व इंजिनियरिंगचं शिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्रातील या विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच खा. सुप्रिया सुळे, धीरज शर्मा, रविकांत वरपे यांच्या मदतीने पंजाबवरून नाशिकच्या मेट भुजबळ नॉलेज सिटी आडगाव नाशिक इथं आणण्यात आलं. त्यानंतर नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सुखरूप पाठविण्यात आलं.

६ बसमधून रवानगी

पहिल्या टप्प्यात आलेल्या १२० विद्यार्थ्यांना रात्री उशिरा मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या विद्यार्थी वसतिगृहात राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर सकाळी अल्पोपहार देऊन सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांना ६ बसच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात पाठविण्यात आलं. 

हेही वाचा- मुंबई, पुण्यात बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक

येथील विद्यार्थ्यांचा समावेश

यामध्ये नागपूर-वर्धा-अकोला-बुलढाणा १६, औरंगाबाद-जालना-परभणी-लातूर १६, पुणे-२२, मुंबई-ठाणे-पालघर-रायगड १५, अहमदनगर-बीड-उस्मानाबाद-सोलापूर २४, सातारा-सांगली-कोल्हापूर -रत्नागिरीतील १५ विद्यार्थी ६ बसच्या माध्यमातून घरी पाठविण्यात आले आहेत. या सर्व बसमध्ये विद्यार्थ्यांना प्रवासात जेवणाची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. 

यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे म्हणाले की, आजवर ज्या गोष्टींना कधी सामोरे जाण्याची वेळ आली नाही. ती वेळ आज आपल्यावर आली असून या महामारीच्या संकटाला सामोरं जावं लागत आहे. परंतू या संकटावर एकमेकांच्या मदतीने आपण मात करू शकतो. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व मेट भुजबळ नॉलेज सिटीचे संचालक समीर भुजबळ यांनी विद्यार्थ्यांची उत्तम व्यवस्था भुजबळ नॉलेज सिटीच्या माध्यमातून केली. 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा