Advertisement

१०वी-१२वी बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासणीचं ८५ टक्के काम पूर्ण

१०वी व १२वीच्या निकालाचं काम ८५ टक्के पूर्ण झाल्यानं निकालाची पुढची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती मिळते.

१०वी-१२वी बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासणीचं ८५ टक्के काम पूर्ण
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन जारी करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनमुळं अनेक सरकारी काम व शैक्षणिक अभ्यासक्रमाला चांगलाच ब्रेक लागला आहे. यामध्ये १०वी व १२वीच्या उत्तरपत्रिकांचा ही समावेश असून उत्तरपत्रिकांचा मूल्यांकन रखडलं. परंतु, कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढत चाललेली संख्या आणि रेड झोन असलेल्या मुंबईत विविध आव्हानांचा सामाना करत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागाच्या निकालाचं काम प्रगतीपथावर असून उत्तरपत्रिका मूल्यांकनाचं ८५ टक्के काम पूर्ण झालं आहे.

१०वी व १२वीच्या निकालाचं काम ८५ टक्के पूर्ण झाल्यानं निकालाची पुढची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती मिळते. कोरोनामुळं राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १०वी आणि १२वीच्या परीक्षांचा निकाल कधी लागेल याबाबत अद्याप निश्चित काहीही सांगता येत नाही. राज्य मंडळाच्या एकूण ९ विभागीय मंडळापैकी मुंबई विभागीय मंडळात सर्वाधिक विद्यार्थी संख्या आहे.

हेही वाचा - दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार? बोर्डाने दिलं हे उत्तर

लॉकडाऊनमुळं उत्तरपत्रिका तपासणीसाठी अडथळे येत होते. परंतु, विद्यार्थ्यांच भवितव्य लक्षात घेत उत्तरपत्रिका तपासण्याचं काम तब्बल ८५ टक्के पूर्ण केलं. मुंबई विभागानं आपल्या कामाची सुरुवात पालघर जिल्ह्यांपासून करत नंतर रायगड, ठाणे शहर, ठाणे उपनगर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगरापर्यंत केली. 

मुंबईत आणि मुंबई बाहेर अडकलेल्या तपासणीकांपर्यंत उत्तरपत्रिका पोहचवण्यासाठी त्यांच्या आपत्तकालीन पासची व्यवस्था करण्यापर्यंत सर्व व्यवस्था मुंबई विभागीय मंडळाने राज्य सरकार, शिक्षण विभाग, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलिस प्रशासनाच्या मदतीने पूर्ण केली. यासाठी मुंबई विभागाने उत्तरपत्रिकांसाठी सबमिशन सेंटरची देखील वाढ केली.हेही वाचा -

कोरोनामुळं भारतीय संघाचे 'हे' दोन्ही दौरे रद्द

कन्टेंमेंट झोनच्या यादीत वाढ, 'या' नव्या परिसरांचा यादीत समावेशRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा