Advertisement

मुंबई महापालिकेतील सर्वच शाळांना सहलीला न्या!


मुंबई महापालिकेतील सर्वच शाळांना सहलीला न्या!
SHARES

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील इयत्ता चौथी आणि सातवीमधील सर्वच मुलांना यंदा घाटकोपरमधील किडझानिया थीम पार्कमध्ये सहलीला नेण्यास शिक्षण समितीने मान्यता दिली आहे. मात्र, 'केवळ चौथी आणि सातवीच्या मुलांना सहलीला न नेता सर्वच इयत्तेतील मुलांना सहलीला नेले जावे,' अशी मागणी शिक्षण समितीने केली असून यासाठी नगरसेवकांनी आपला निधी देण्याचीही तयारी दर्शवली आहे.


काय होती मागणी?

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील इयत्ता ४ थी आणि ७वीच्या मुलांची सहल घाटकोपर येथील किडझानिया थीम पार्क येथे नेण्याचा प्रस्ताव शिक्षण समितीपुढे मंजुरीसाठी मांडण्यात आला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. सईदा खान यांनी प्रशासनाचे आभार मानून यापूर्वी या दोन्ही इयत्तेतील एकूण मुलांच्या दहा टक्के मुलांना सहलीला नेले जायचे. परंतु, आपल्या लक्षात ही बाब आल्यानंतर आपण या दोन्ही इयत्तेतील १०० टक्के मुलांना सहलीला घेऊन जावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार आता या दोन्ही इयत्तेतील सर्वच मुलांना सहलीला नेले जात आहे.


मुलांच्या नाश्त्याचीही हेळसांड

महापालिका शाळांमधील मुले ही गरीब असल्यामुळे त्यांना सहलीला नेलेच पाहिजे असे सांगत मागील वर्षातील काही वाईट अनुभव शिवसेनेचे साईनाथ दुर्गे यांनी सांगितले. मुलांना नाश्त्याऐवजी केवळ पारलेजीची बिस्किटे दिली असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. त्यामुळे अशा प्रकारच्या सहलीसाठी मध्यवर्ती मदतकेंद्र तयार करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. भाजपाच्या अनुराधा पोतदार यांनी सर्वच इयत्तेतील मुलांना सहलीला नेण्याची मागणी करत नगरसेवक निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली. तर, माजी महापौर स्नेहल आंबेकर यांनी मागील वर्षी किडझानिया थीम पार्कला गेलेल्या सहलीचा अहवाल दिला जावा, अशी मागणी केली.


मुलींच्या बसमध्ये महिला सेवकच असावा

सहल आयोजित करणाऱ्या आयोजकांवरच बस सेवा पुरवण्याची, तसेच जेवण नाश्ता पुरवण्याची जबाबदारी सोपवावी, अशा सूचना शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुडेकर केल्या. तसेच सहलीला जाणाऱ्या मुलींच्या बसेसमध्ये महिला शिक्षण सेवकच असावेत, असे सांगत सहलीला मान्यता देण्यात आली.



हेही वाचा

मुंबई महापालिका शाळांमध्ये आता केम्ब्रिजचा अभ्यासक्रम!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा