Advertisement

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं दिवाळीपर्यंत शाळ बंदच राहणार

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय दिवाळीनंतर घ्यावा, असे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी ठरविण्यात आले.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं दिवाळीपर्यंत शाळ बंदच राहणार
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून शाळा व कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्षण मंडळानं हा निर्णय घेतला होता. परंतु, आता तब्बल लवकरच शाळा सुरू होणार असल्याची चर्चेनं जोर धरला असून, केंद्र सरकारने १५ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास मुभा दिली. मात्र असं असलं तरी राज्यातील शाळा दिवाळीपर्यंत बंदच राहणार आहेत. 

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय दिवाळीनंतर घ्यावा, असे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी ठरविण्यात आले. केंद्रानं परवानगी दिली असली तरी महाराष्ट्रात शाळा सुरू करण्याची घाई करू नये, असाच सर्व मंत्र्यांचा सूर होता. काही देशांमध्ये शाळा व महाविद्यालये सुरू करण्यात आल्यावर विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला, याकडे काही मंत्र्यांनी लक्ष वेधले.

सध्या ऑनलाइनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जात आहे. अशावेळी शाळा सुरू करण्याची घाई करू नये, असं मत मंत्र्यांकडून व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव किती आहे, याचा आढावा घेऊन २० नोव्हेंबरनंतरच शाळा सुरू करण्याबाबत विचार होईल.



हेही वाचा -

प्रवाशांसाठी गुड न्यूज! ९ आॅक्टोबरपासून धावणार ‘या’ ५ विशेष एक्स्प्रेस

मुंबईकरांनो सांभाळून रहा! येत्या २-३ दिवसांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा