Advertisement

विद्यापीठाची सुरक्षा वाऱ्यावर; ३०० सीसीटिव्ही फक्त कागदावर


विद्यापीठाची सुरक्षा वाऱ्यावर; ३०० सीसीटिव्ही फक्त कागदावर
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये काही महिन्यांपूर्वी एका विद्यार्थिंनीचा विनयभंग झाल्याचं प्रकरण उघडकीस आलं होतं. या प्रकरणानंतर विद्यापीठाच्या सुरक्षेसाठी ३०० सीसीटिव्ही बसवण्यात येणार असल्याचं घोषणा विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आली होती. मात्र विद्यापीठाची ही घोषणा फक्त कागदावरच राहिली अाहे. अद्याप एकही सीसीटिव्ही बसवला गेलेला नाही. विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसची सुरक्षा वाऱ्यावर सोडण्यात आल्याचं यातून दिसून येत अाहे. 


पोलिस चौकीही कागदावर

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील रानडे भवनात ४ ऑगस्टला एका विद्यार्थिनीचा विनयभंग झाला होता. या प्रकरणानंतर विद्यापीठातील रानडे भवन, परीक्षा केंद्र, आयडॉल, महिला प्रसाधनगृह यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटिव्ही नसल्याचंही स्पष्ट झालं होतं. यावर अनेक विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पवित्रा धारण करत विद्यापीठ प्रशासनाची भेट घेतली होती. या भेटीनंतर लगेचच कलिना कॅम्पसमध्ये विविध ठिकाणी ३०० सीसीटिव्ही व दोन पोलिस चौकी उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. यासाठी त्तत्वता मान्यता देण्यात आली होती. 


२०१२ मध्ये प्रस्ताव

२०१२ साली कलिना कॅम्पसमधील ६० इमारतींसाठी २९९ सीसीटिव्हीची गरज असल्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानंतर ४ ऑगस्ट २०१८ रोजी रानडे भवनात विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्यानंतर विद्यापीठात सीसीटिव्ही नसल्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. त्यानंतर सीसीटिव्ही बसवण्याची घोषणा करून तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी आजतागायत विद्यापीठात सीसीटिव्ही बसवण्यात आलेले नसल्याची धक्कादायक माहिती मुंबई लाइव्हच्या हाती आली आहे. विशेष म्हणजे विद्यापीठ प्रशासन याबाबत कोणत्याही प्रकारची हालचाल करत नसल्याचं स्पष्ट होत आहे. 


काही दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठात एका मुलीचा विनयभंग झालेला प्रकार लांच्छानास्पद आहे. त्याच पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वी ३०० सीसीटिव्हीची बसवण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु आजतागायत कोणत्याही प्रकारच काम विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत नाही. विशेष म्हणजे याबाबत अधिकाऱ्यांना पत्रव्यवहारही करण्यात आला अाहे. याबाबत विचारणा केल्यानंतर अधिकारी उडवाउडवीची उत्तर देत असून हा विषय टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. 

-  सुप्रिया कारांडे,  सिनेट सदस्या, युवा सेना


 सीसीटिव्ही बसवण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरात लवकरच सीसीटिव्ही बसवण्यात येतील. सीसीटिव्हीबाबतच मॅपिंग सुरू असून पोलिस चौकीबाबतचीही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळं कलिना कॅम्पसमध्ये लवकरात लवकर ३०० सीसीटिव्ही, दोन पोलिस चौकी यांसह इतर सुरक्षेच्या सुविधाही देण्यात येतील. 

- नामदेव बुकाणे, सुरक्षा अधिकारी, मुंबई विद्यापीठ



हेही वाचा - 

बीएमएमच्या परीक्षेत हॉलतिकीट गोंधळ

शिक्षण, रोजगार हक्कासाठी २१ नोव्हेंबरला मंत्रालयावर मोर्चा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा