Advertisement

विद्यावेतन वाढीवर १५ दिवसांत निर्णय


विद्यावेतन वाढीवर १५ दिवसांत निर्णय
SHARES

शिकाऊ डाॅक्टरांच्या विद्यावेतनाच्या कागदपुर्ततेसाठी १५ दिवस लागणार असून तोपर्यंत त्यांनी काम बंद आंदोलनाची हाक मागे घ्यावी, असं आवाहन सरकारकडून बुधवारी डॉक्टरांना करण्यात आलं.


शिकाऊ डाॅक्टरांच्या विद्यावेतन वाढीवर मंत्रालयात बुधवारी बैठक घेण्यात आली. त्यावेळी डाॅक्टरांचे प्रतिनिधी आणि वैद्यकीय शिक्षण संचालनालय यांच्यात हा ठराव करण्यात आला. 


गिरीश महाजन लक्ष ठेवून

विद्यावेतन वाढीसाठी शिकाऊ डाॅक्टर सध्या काळ्या फिती लावून रुग्ण सेवा देत आहेत. २ मे ला मंत्रालयात प्रतिनिधींची बैठक ठरवण्यात आली होती.

दीड तास झालेल्या या बैठकीत शिकाऊ डाॅक्टर अस्मी संघटनेचे प्रतिनिधी, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे अधिकारी आणि अर्थविभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. या बैठकीत विद्यावेतन या प्रश्नावर गिरीश महाजन लक्ष ठेवून असल्याचं प्रतिनिधींना सांगण्यात आलं.


३ मे पासून दिला होता संपाचा इशारा

कार्यालयीन कार्यवाहीकरता १५ दिवसांचा कालावधी लागेल. त्यामुळे शिकाऊ डाॅक्टरांनी घोषित केलेलं कामबंद आंदोलन मागे घ्यावं, असं सांगण्यात आलं.

याबाबत असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न संघटनेचे सचिव असिफ पटेल यांना विचारलं असता, १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं. येत्या आठ दिवसात सरकारच्या या निर्णयावरील हालचालींचा अंदाज येईल. तरीही बैठकीदरम्यान सरकार विद्यावेतन वाढीसाठी सकारात्मक दिसून आल्याचंही पटेल यांनी सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा