Advertisement

डिप्लोमा अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया जाहीर

राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, विद्यार्थ्यांना अर्जभरण केंद्रातून मिळणाऱ्या सांकेतिक क्रमांकाद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येतील.

डिप्लोमा अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया जाहीर
SHARES

मुंबईसह राज्यातील डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशाची प्रवेशप्रक्रिया नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना १२ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर १३ जुलैला प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार असल्याच सीईटी सेलने जाहीर केलं आहे. राज्य तंत्रशिक्षण संचालनालय (डीटीई) आणि सीईटी सेलतर्फे ही प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, विद्यार्थ्यांना अर्जभरण केंद्रातून मिळणाऱ्या सांकेतिक क्रमांकाद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येतील.


१० टक्के जागा राखीव

या डिप्लोमा अभ्याससक्रमासाठी आयटीआय, बारावी बायफोकल, बारावी सायन्स, बारावी एमसीव्हीसी इत्यादी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदविका अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश दिला जातो. या प्रवेशक्षमतेच्या १० टक्के जागा या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात.


'या' वेबसाइटला भेट द्या

दरवर्षी आयटीआयप्रमाणेच बारावी विज्ञानला कमी गुण मिळालेले विद्यार्थीही द्वितीय वर्षाला मोठ्या संख्येन प्रवेश घेतात. या प्रवेशप्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी संचालनालयाच्या www.mahacet.org/dsd18 या वेबसाइवर भेट देण्याचं आवाहन 'डीटीई'तर्फे करण्यात आलं आहे.

वेळापत्रकानुसार यंदाही प्रवेशाच्या चार फेऱ्या होणार आहेत. या प्रवेशप्रक्रियेत विद्यार्थ्यांना सुविधा केंद्र (फॅसिलिटेशन सेंटर) प्रवेश अर्ज घ्यावा लागणार आहे. खुल्या प्रवर्गाला ४०० तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ३०० रुपये प्रवेश शुल्क भरावं लागणार आहे.


'अशी' होईल प्रवेशप्रक्रिया

  • प्रवेश अर्ज भरण्याची मुदत - १२ जुलैपर्यंत
  • कागदपत्रांची छाननी व स्वीकृती - १२ जुलैपर्यंत
  • प्राथमिक गुणवत्ता यादी - १३ जुलै
  • प्राथमिक यादीवर त्रुटी व आक्षेप - १४ ते १६ जुलै
  • अंतिम गुणवत्ता यादी - १६ जुलै सायंकाळी ५ वाजता
  • पर्याय भरण्याची मुदत - १८ ते २१ जुलै
  • प्रवेशाचा पहिला कॅप राऊंड - २२ जुलै
  • पहिल्या कॅप राऊंडचे प्रवेश - २३ ते २६ जुलै
  • दुसऱ्या राऊंडसाठी पर्याय भरण्याची मुदत -२८ ते ३१ जुलै
  • प्रवेशाचा दुसरा कॅप राऊंड - १ ऑगस्ट
  • दुसऱ्या राऊंडचे प्रवेश : २ ते ४ ऑगस्ट
  • तिसऱ्या राऊंडसाठी पर्याय भरण्याची मुदत - ६ ते ९ ऑगस्ट
  • प्रवेशाचा तिसरा कॅप राऊंड - १० ऑगस्ट
  • तिसऱ्या कॅप राऊंडचे प्रवेश - ११ ते १४ ऑगस्ट
  • चौथ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील - १८ ऑगस्ट
  • चौथ्या फेरीसाठी पर्याय फेरी - १९ ते २० ऑगस्ट
  • चौथ्या फेरीची यादी - २१ ऑगस्ट
  • चौथ्या फेरीची प्रवेशाची मुदत - २२ ते २३ ऑगस्ट



हेही वाचा-

अकरावी प्रवेशासाठी अडीच लाख अर्ज

बीएससी-आयटीचा निकाल जाहीर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा