SHARE

डिसेंबर महिना सुरू झाला की सर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांना विविध फेस्टिवलचे वेध लागतात. फेस्टिवलची पूर्वतयारी, पोस्टर्स, मिडीया पार्टनर, विविध सब इवेंट, यातून सर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ पहायला मिळतं आहे. अशावेळी इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहण्यासाठी यंदा वेगळी संकल्पना घेऊन विलेपार्लेच्या साठ्ये कॉलेजमधील जाणीव महोत्सवही सज्ज झाला आहे.

येत्या १८ आणि १९ डिसेंबरदरम्यान साठ्ये कॉलेजातील जाणीव एक सामाजिक महोत्सव रंगणार असून मन की स्वच्छता ही या वर्षीची संकल्पना असणार आहे. 


स्पर्धेचं आयोजन 

समाजाला प्रदूषित करणारी सामाजिक घाण कायमची नष्ट व्हावी, सर्वसामान्य लोकांची विविध विषयाबाबतची मानसिकता बदलणं, लोक काय बोलतील यापेक्षा आपला त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा बदलेलं याकडे लक्ष देण्यासाठी मन की स्वच्छता ही संकल्पना जाणीवमध्ये राबवण्यात येणार आहे. याद्वारे पोस्टरमेकिंग, वक्तृत्व, ओपन माइक, समूह नृत्य, ग्रुप डान्स, पथनाट्य सारखी विविध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. 


एनएसएसतर्फे अायोजन

जाणीव एक सामाजिक महोत्सव असं साठ्ये कॉलेजच्या या महोत्सवाचं नाव असून यंदा जाणीवचं २४ वे वर्ष आहे. याआधी बालकामगार, समस्यामुक्त भारत, स्त्री पुरूष समानता यांसारख्या वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या विषयांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) तर्फे या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाचं आयोजन करण्यात येत असून गेल्या काही वर्षांपासून हा फेस्टिवल कॉलेज तरूणांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरला आहे.


२ दिवस महोत्सव

यंदाचा जाणीव महोत्सव दोन दिवस असणार असून यात १८ डिसेंबरला पहिल्या दिवशी पथनाट्य, पोस्टर मेकिंग, वक्तृत्व स्पर्धा या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. तर १९ डिसेंबरला ग्रुप डान्स, ओपन माईक, या दोन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. हेही वाचा - 

१४ ते १६ डिसेंबर दरम्यान रंगणार आयआयटीचा टेकफेस्ट

सिनेट सदस्यांच्या मागण्यांकडे कुलगुरूंचा कानाडोळा- युवासेना
संबंधित विषय
ताज्या बातम्या