Advertisement

सप्टेंबरमध्ये शाळा उघडणार? शिक्षणमंत्री म्हणाल्या…

चौथ्या टप्प्यात राज्यातील शाळा सुरू होऊ शकतील, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

सप्टेंबरमध्ये शाळा उघडणार? शिक्षणमंत्री म्हणाल्या…
SHARES

कोरोनाचं संकट आणि लाॅकडाऊनमुळे विस्कळीत झालेलं जीवनमान पुन्हा ट्रॅकवर आण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत लाॅकडाऊनमध्ये बऱ्यापैकी शिथिलता आणलेली आहे. राज्य सरकारच्या अनलाॅकचा तिसरा टप्पा ३१ आॅगस्ट रोजी संपत असून संपत असून १ सप्टेंबरपासून अनलाॅकच्या चौथ्या टप्प्याला सुरूवात होत आहे. या चौथ्या टप्प्यात राज्यातील शाळा सुरू होऊ शकतील, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. (education minister varsha gaikwad comment about reopening of schools in maharashtra during unlock)

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि लाॅकडाऊन या पार्श्वभूमीवर शाळा-काॅलेज सुरू करायचे की नाहीत याचा अंतिम निर्णय केंद्र सरकारचं गृहमंत्रालयचं घेतं. लाॅकडाऊनच्या नियमांतर्गत ३१ आॅगस्टपर्यंत तरी राज्य सरकार शाळा सुरू करू शकत नाही. परंतु गृहमंत्रालयाने परवानगी दिली आणि राज्य सरकारचंही त्यावर एकमत असेल तर अनलाॅकच्या चौथ्या टप्प्यात राज्यातही शाळा सुरू करता येतील. तसं झालंच तर सगळ्यात आधी दहावीचे वर्ग सुरू करण्याला आमचं प्राधान्य असेल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने आम्ही इतर इयत्तांचे वर्ग देखील सुरू करू.  

हेही वाचा - लाॅकडाऊन पूर्णपणे काढून टाका! मनसेच्या सर्वेक्षणाचा कौल जाहीर

कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे देशभरातील शाळा-काॅलेज मार्च महिन्यापासून बंद ठेवण्यात आले आहेत. या दरम्यान राज्यातील शिक्षण मंडळासोबतच सीबीएसई, आयसीएसई यासारख्या बोर्डांना विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. परीक्षासंदर्भातील न्यायालयाच्या दारापर्यंत जाऊन पोहोचले. 

महाराष्ट्र सरकारने आॅनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शैक्षणिक वर्ष सुरू केलं असलं, तरी त्याला असंख्य मर्यादा येत आहेत. कम्प्युटर, मोबाईलची अनुपलब्धता, इंटरनेटची सुविधा नसणे, शिक्षकांचं मार्गदर्शन न मिळणे यांसारखे असंख्य प्रश्न विद्यार्थ्यांना भेडसावत आहेत. विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये याची चिंता पालकांना भेडसावत असून शाळा कधी सुरू होतील, याचीही ते वाट बघत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला त्यांना कोरोनाची भीती देखील वाटत आहे.  

या सगळ्या बाबींवर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनेकदा अमेरिकेचं उदाहरण देतात. तिथं शाळा सुरू केल्यानंतर ९० हजारांहून अधिक मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे मीडिया रिपोर्ट आहेत. तेव्हा अशी जोखीम मी महाराष्ट्रात घेऊ शकत नाही, असं मुख्यमंत्री वारंवार सांगत आहेत. तेव्हा सप्टेंबरमध्ये शाळांबाबत सरकार काय निर्णय घेते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा