Advertisement

एल्फिन्स्टन दुर्घटनेतील आकाशने दिली घरातून परीक्षा


एल्फिन्स्टन दुर्घटनेतील आकाशने दिली घरातून परीक्षा
SHARES

एल्फिन्स्टन दुर्घटनेत जखमी झालेल्या आकाश परबने शुक्रवारी त्याच्या राहत्या घरी बी.कॉम. दुसऱ्या वर्षाच्या तिसऱ्या सत्राची परीक्षा दिली. मुंबई विद्यापीठ आणि विक्रोळी महाविद्यालयातील प्रतिनिधी यांनी आकाशच्या घरी जाऊन त्याची परीक्षा घेतली. विद्यापीठाच्या नियमानुसार त्याला वाढीव १ तास सुद्धा देण्यात आला.


वर्ष वाया जाऊ नये म्हणून...

भांडुपच्या रामानंद आर्य डि.ए.व्ही. महाविद्यालयात बी.कॉम.च्या दुसऱ्या वर्षाला शिकणाराआकाश परब एल्फिन्स्टन दुर्घटनेत जखमी झाला होता. त्याचं वर्ष वाया जाऊ नये म्हणून परीक्षा विभागाने त्याची घरी जाऊन परीक्षा घेतली.


आश्वासन पाळलं

याआधी आकाश रुग्णालयात असताना परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. अर्जून घाटुळे यांनी केईएम रुग्णालयात जाऊन आकाशची भेट घेतली होती. त्यावेळी आकाशाला परीक्षा देता येईल, असं आश्वासन त्यांनी दिलं होतं.

निकाल लावण्याचं आश्वासन पाळो न पाळो पण, मुंबई विद्यापीठाने दिलेलं हे आश्वासन पाळत त्याला घरी राहून पेपर देण्याची सवलत दिली. आकाश उर्वरित पेपरही घरूनच देणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा