एल्फिन्स्टन पूल दुर्घटना: 'ते' गहिरे घाव भरून निघण्यास थोडा वेळ लागेल...


SHARE

एल्फिन्स्टन ब्रीजवरील चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या प्रवाशांच्या केवळ शरीरावरच नाही, तर मनावर देखील गहिरे घाव झालेत. हे घाव इतक्यात भरून येणारे नाहीत हे लक्षात घेऊन केईएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांचं सध्या समुपदेशन करण्यात येत आहे. या रुग्णांना मानसिक तणावातून बाहेर येण्यास आणखी काही काळ लागेल, असं डाॅक्टरांचं म्हणणं आहे. 

केईएम रुग्णालयातील जखमींपैकी एक आहे आकाश परब... ज्याला अजूनही हे माहीत नाही की त्याच्या भावाचा या घटनेत मृत्यू झाला आहे. त्याला सत्य परिस्थिती कळाल्यास मोठा मानसिक धक्का बसेल. त्यामुळे आकाशला या धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी त्याच्यावर प्रयत्नपूर्वक उपचार करण्यात येत आहेत.  

या चेंगराचेंगरीत बऱ्याच महिला प्रवाशांना दुखापत झाली आहे. त्यांच्यावर देखील केईएममध्ये उपचार सुरू आहेत. मानसिक धक्का बसल्याने बहुतांश महिला व्यक्त होण्यास कचरत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना जास्तीत जास्त बोलतं करण्याचा प्रयत्न करत आहोत. आप्तस्वकीय, मित्रमंडळीकडे मनातील भावना व्यक्त केल्यास त्यांना हलकं वाटू शकेल. तोपर्यंत या सर्वच महिला रुग्णांना हळूवारपणे हाताळावं लागणार असल्याचं केईएमच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ.शुभांगी पारकर यांनी सांगितलं. 

या घटनेतील रुग्णांना झालेल्या शारीरिक जखमांपेक्षा मानसिक जखमा अधिक गंभीर आहेत. मृत्यू जवळून पाहिल्यामुळे त्यांची भीती एवढ्यात जाणार नाही. महिलांच्या मनात एखादी गंभीर गोष्ट बसली की ती बाहेर काढायला वेळ लागतो.   

- डॉ. शुभांगी पारकर, मानसोपचार विभाग प्रमुख, केईएम रुग्णालय


सपोर्टिव्ह सायको थेरेपी

सध्या या रुग्णांवर ‘सपोर्टिव्ह सायको थेरपी’ सुरू करण्यात आली आहे. म्हणजेच रुग्णाशी गप्पा मारून त्यांच्या मनातील भीती जाणून त्यावर उपाय केले जातात. रूग्णाचं कुठल्याही प्रकारचं मानसिक खच्चीकरण होऊ नये, हाच यामागचा उद्देश आहे.


योगाद्वारे उपचार

एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेतील जखमींना सकाळी एक डॉक्टर आणि काही मानसोपचारतज्ज्ञ भेट देतात. त्यांच्या मानसिक स्वास्थासाठी त्यांना योगा शिकवला जातो. काही कसरती करवून घेतल्या जातात. जेणेकरुन, त्यांचं मन एकाग्र होईल.हेही वाचा -

एल्फिन्स्टन रेल्वे दुर्घटना: ‘या’ ६ हातांनी वाचवले शेकडो प्रवाशांचे प्राण

एल्फिन्स्टन पूल चेंगराचेंगरी : वरळीच्या मयुरेश हळदणकरचा दुर्दैवी अंतडाऊनलोड करा Mumbai live APP  आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय