Advertisement

एक तृतीयांशांपेक्षा जास्त इंजिनिअरिंग पदवीधरांना नोकरीची चिंता

सध्याच्या अडचणीच्या काळात नव्याने इंजिनिअर झालेल्या पदवीधारकांना नोकरी मिळवताना अडचणी येत असल्याचं निरिक्षण आयपी संचलित इन्क्युबेशन लॅब ब्रिजलॅब्ज सोल्युशन एलएलपीद्वारे करण्यात सर्वेक्षणातून नोंदवण्यात आलं आहे.

एक तृतीयांशांपेक्षा जास्त इंजिनिअरिंग पदवीधरांना नोकरीची चिंता
SHARES

कोरोना संकट आणि लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्रांना आर्थिक मंदीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बहुतांश कंपन्यांनी त्यांची नवीन भरती प्रक्रिया थांबवली आहे किंवा कर्मचारी कपात करण्यास सुरूवात केली आहे. सध्याच्या अडचणीच्या काळात नव्याने इंजिनिअर झालेल्या पदवीधारकांना नोकरी मिळवताना अडचणी येत असल्याचं निरिक्षण आयपी संचलित इन्क्युबेशन लॅब ब्रिजलॅब्ज सोल्युशन एलएलपीद्वारे करण्यात सर्वेक्षणातून (engineer graduates difficult to find a new job as per bridgelabz survey ) नोंदवण्यात आलं आहे. इंजिनिअरिंगच्या विविध शाखांमधील जवळपास १००० च्या आसपास (६० % मुले आणि ४०% मुली) विद्यार्थ्यांदरम्यान केल्या गेलेल्या या सर्वेक्षणातून नोकरीच्या शोधात असणाऱ्यांच्या काही प्रमुख अडचणी समोर आल्या आहेत.

या सर्वेक्षणाद्वारे, कोरोना संकटानंतर इंजिनिअर्सच्या कौशल्यातील तफावत भरून काढण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे. प्रतिसाद दिलेल्यांपैकी ७६% विद्यार्थ्यांनी त्यांच्या कॉलेजमध्ये सक्रिय प्लेसमेंट विभाग असल्याचं कबूल केलं, तर इतरांनी वेगळं मत मांडलं. बहुतांश विद्यार्थ्यांनी सक्रीय प्लेसमेंट विभाग असल्याचं मान्य केलं असलं तरीही, एक पंचमांशांपेक्षा जास्त म्हणजे २४% विद्यार्थ्यांनी त्याद्वारे नोकरी मिळण्याकरीता ते पात्र असल्याचं सांगितलं. यातून असं सूचित होतं की, तब्बल ७८.६४% विद्यार्थ्यांकडे सध्या कोणतीही नोकरी नाही.

हेही वाचा - BA, Bsc आणि Bcom च्या परीक्षा होणार नाहीच- उदय सामंत

सर्वेक्षणानुसार, ३५.४८% नोकरी शोधणारे इंजिनिअर्स वेळेवर नोकरी मिळेल की नाही याबाबत चिंतेत आहेत. अपेक्षित पॅकेजपासून ते नोकरीच्या संधीचा स्रोत इथपर्यंत असंख्य विषयांची त्यांना भीती आहे. विशेष म्हणजे प्रतिसाद दिलेल्यांपैकी २६.९६% पदवीधारकांनाच त्यांच्याकडे असलेल्या कौशल्यांच्या बळावरअपेक्षित पॅकेज मिळण्याचा आत्मविश्वास आहे. नोकरी शोधणाऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी अनुभवात्मक शिक्षणासह मजबूत कौशल्य महत्त्वाचं आहे, हेदेखील आकडेवारीवरून दिसून येतं.

ब्रिजलॅब्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण महादेवन म्हणाले, “या सर्वेक्षणातून अनेक विचार करण्याजोगे मुद्दे समोर आले. पहिला म्हणजे, सर्वच इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांच्या कॉलेजमध्ये कॅम्पस प्लेसमेंटची सुविधा नाही. दुसरा म्हणजे, अशा प्रकारच्या सुविधा खात्रीशीर नाहीत. सध्याच्या आर्थिक मंदीमुळे भरती प्रक्रियेला अचानक विराम मिळाल्याने ही स्थिती आहे. अखेरचा मुद्दा म्हणजे, नोकरी शोधणा-यांना अपेक्षित मोबदल्यासह लवकरच नोकरी मिळेल की नाही याचा आत्मविश्वास नाही.”

“सध्याची स्थिती पाहता, नोकरी शोधणा-यांसाठी एखाद्या मजबूत कौशल्य समूहांची गरज आहे. जेणेकरून त्यांना या स्पर्धात्मक बाजारपेठेत प्रवेश मिळण्याची खात्री मिळेल, तसंच त्यांच्या मेहनतीनुसार, त्यांना योग्य इच्छित पॅकेज मिळू शकेल,” असं महादेवन पुढे म्हणाले.

हेही वाचा - शाळा सुरु झाल्यावरही ऑनलाईन लर्निंग सुरू ठेवण्याकडे विद्यार्थ्यांचा कल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा