बस्स... आता शाळांची मनमानी खपवून घेणार नाही

मुंबई - शिक्षणाच्या नावाखाली शाळांनी सध्या शिक्षणाचा बाजार मांडलाय. हवी तशी आणि हवी तितकी फी वाढवायची नि पालकांची आर्थिक लूट करायची, हा शाळांचा धंदाच झाला आहे. शाळा आणि शाळा व्यवस्थापन पालकांची जणू लूटच करत आहे. मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचं निदर्शनात आलं आहे. 

मुंबईतील एक दोन नव्हे तर जवळपास सर्वच शाळांमध्ये हीच परिस्थिती आहे. पण आता बस्स झाली ही मनमानी, असं म्हणत आता पालक जागे झाले आहेत. शाळांच्या मनमानीला कंटाळलेल्या या पालकांनी फोरम ऑफ फेअरनेस इन एज्यूकेशनकडे धाव घेतली आहे. जवळपास असे 1500 पालक एकत्रित आले आहेत. आता हे पालक आणि फोरम शाळांविरोधात जनआंदोलन उभारणार आहेत. 

शाळांची मनमानी सरकारने रोखवी यासाठी सह्यांची मोहीम राबवण्यात येणार आहे. तर पालकांना न घाबरता शाळांविरोधात पुढे येण्याचं आवाहन करणार आहेत. यानंतरही सरकारला जाग आली नाही तर हे पालक बेमूदत उपोषणाला बसण्याबरोबरच न्यायालयातही धाव घेणार आहेत. 

Loading Comments