Advertisement

Coronavirus Updates: राज्यातील काही शाळा, कॉलेजांमध्ये परीक्षा अद्याप सुरूच

काही शाळां व कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा (Exam) घेत असल्याचं समोर आलं आहे.

Coronavirus Updates: राज्यातील काही शाळा, कॉलेजांमध्ये परीक्षा अद्याप सुरूच
SHARES

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा असं आवाहन केलं. त्यानुसार, राज्यातील अनेक पर्यटन स्थळं, प्रार्थनास्थळं, पार्क यासारखी अनेक गर्दीची ठिकाणं नागरिकांसाठी बंद केली. त्याशिवाय, शाळा व कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी (Student Safety) शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, काही शाळां व कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा (Exam) घेत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं सुट्ट्यांबाबत सर्वत्र गोंधळ असल्याचं चित्र सध्या दिसतं आहे.

राज्य सरकारनं (State Government) मुंबईतील शाळा, कॉलेजे बंद करण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला. यावेळी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या (State Secondary and Higher Secondary Board) परीक्षा वगळता शाळांचे कामकाज बंद राहील असं राज्य सरकारनं सांगितलं होतं. मात्र, तरीही काही शाळांमध्ये नववीच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. त्याशिवाय, कॉलेजांमध्येही परीक्षा घेऊ नयेत, असं स्पष्ट आदेश असतानाही कॉलेजांमध्ये परीक्षा घेण्यात आल्या आहेत.

काही शाळा आणि कॉलेजे सुरू असल्यामुळं शिक्षक संघटनांनी (Teachers Association) मंत्रालयात धाव घेत विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या शाळा व कॉलेजांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी केली. तसंच, शासनाच्या आदेशानुसार काही शाळांनी विद्यार्थ्यांना सुटी दिली, मात्र शिक्षकांना कामाला बोलावल्यानं मोठा गोंधळ झाला.

यामुळं यासंदर्भात शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांना पत्र लिहून शिक्षकांनाही सुटी द्यावी, तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही सुटी जाहीर करावी आणि केवळ शिक्षकांचं वेतन वेळेत होईल यासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांना बोलवून ते काम पूर्ण करून घ्यावं, अशी मागणी केली आहे.



हेही वाचा -

Coronavirus Updates: उपाययोजनेसाठी निधी खर्च करण्याचे महापालिका आयुक्तांना विशेषाधिकार

Corona Virus: नव्याने भरती होणाऱ्या प्रत्येक बंद्याचे स्क्रीनिंग करावे – गृहमंत्री अनिल देशमुख



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा