Advertisement

80 हजार विदयार्थ्यांचे भवितव्य अंधारात


80 हजार विदयार्थ्यांचे भवितव्य अंधारात
SHARES

मुंबई - विद्यापीठाशी संलग्न अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे इंटरनल गुण विद्यापीठाकडे मुदत संपूनही पाठवले नाहीत. त्यामुळे तृतीय वर्षाच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल मिळणार नाहियेत. त्यामुळे विदयार्थ्यांचे भवितव्य अंधारामय होणाराय. महाविद्यालयांच्या या हलगर्जीचा फटका टीवाय बीए, बीकॉम आणि बीएसीच्या तब्बल 80 हजार विद्यार्थ्यांना बसणाराय.
यामध्ये टीवाय बीकॉमच्या ३२ हजार २१७, बीएसीच्या ३२ हजार ९४८ आणि बीएच्या १४ हजार ४२२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सर्व्हरमधील एररमुळे इंटरनलचे गुण डाऊनलोड करताना अडचणी येत असल्याचं सांगण्यात आलंय. तर काही महाविद्यालयांनी सध्या परीक्षा सुरू असल्यामुळे गुण पाठवण्यास विलंब होत असल्याचं सांगितलं.
"दुसऱ्या विदयापीठातून बारावी उत्तीर्ण विदयार्थ्यांचे सर्टिफिकेट जमा करणे आवश्यक असते. त्याचे व्हेरिफिकेशन व्हायचे आहे. महाविदयालयांना सूचना देऊनही त्यांनी ती प्रक्रिया अपूर्ण ठेवली आहे. त्यासाठी इंटरनल गुण पाठवण्यासाठी मुदत वाढ करण्यात येणार आहे," असं मुंबई विदयापीठाचे कुलसचिव डॉ. एम. ए. खान यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा