एफवायची प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी 1 जून पासून

  Mumbai
  एफवायची प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी 1 जून पासून
  मुंबई  -  

  एफवाय प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी 1 जूनपासून सुरू होणार आहे. mum.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर तुम्हाला प्रवेशपूर्व नोंदणी करता येईल.
  शैक्षणिक वर्ष 2017-18 साठी विद्यापीठाने प्रथम वर्ष बीए, बीए (फ्रेंच, जर्मन स्टडी)बी कॉम, बीएसी, बीएमएम, बीएसडब्ल्यू, बीएससी (नोटीकल सायन्स, होम सायन्स, एव्हिएशन, फोरेन्सिक सायन्स, हॉस्पिटॅलिटी स्टडी), बीकॉम (बी अँड आय, ए अँड एफ, एफ अँड एम), बीएमएस, बिव्होक, लायब्ररी सायन्स, अशा अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमासाठी प्रवेश पूर्व नोंदणी अनिवार्य आहे.

  अर्ज भरताना काय काळजी घ्याल -

  • ऑनलाईन नोंदणी करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी कॉलेजमधून प्रवेश अर्ज आणि माहिती पुस्तिका खरेदी करणे आवश्यक आहे. महिती पुस्तिके नुसारच विषय निवडणे बंधनकारक
  • विद्यार्थ्यांनी नोंदणी अर्जाची प्रत, प्रवेशप्रक्रिये दरम्यान दस्तऐवजाला जोडावी
  • ऑनलाईन नोंदणीसाठी स्कॅन केलेला फोटो आणि स्वाक्षरीची सॉफ्ट कॉपी काढावी
  • ऑनलाईन नोंदणीसाठी मोबाईल क्रमांक आणि इमेल अॅड्रेस असणे आवश्यक आहे.
  • दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिका सोबत असणे आवश्यक
  • प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी 1 जून ते 16 जून या नमूद केलेल्या कालावधीतच होईल.
  • विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन प्रवेश नोंदणी अर्जाची प्रत असल्याशिवाय महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकणार नाही.
  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.