अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' फेरीचा दुसरा टप्पा सध्या सुरू आहे. दहावी फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेले आणि एटीकेटी लागलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अकरावीचा अर्ज भरलेला नाही अशा विद्यार्थ्यांना १० आणि ११ सप्टेंबर हे २ दिवस प्रवेशाकरीता अर्ज भरण्यासाठी शेवटची संधी आहे. दरम्यान, मंगळवारी मोहरमची सुट्टी असली तरी सर्व मदत केंद्र सुरू असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयानं दिली आहे.
दहावी फेरपरीक्षेत उत्तीण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. तसंच, ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अकरावीचा अर्ज भरलेला नाही अशा विद्यार्थ्यांना १० आणि ११ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहे.
अकरावी एफसीएफएस टप्पा २ साठी अकरावी ऑनलाइनच्या एकूण ९७ हजार १५० जागा तर, कोट्याच्या एकूण २५ हजार ७७१ जागा उपलब्ध आहेत. यामध्ये कला शाखेच्या १४ हजार ४६, वाणिज्य शाखेच्या ४० हजार ८८१, विज्ञान शाखेच्या ३९ हजार ८५८ आणि एचएसव्हीसीच्या २ हजार ३६८ जागा आहेत. त्याशिवाय, कोट्याच्या २५ हजार ७७१ जागांमध्ये अल्पसंख्याकांसाठी १३ हजार ४६४, इनहाउस ४ हजार ८३८ आणि व्यवस्थापन कोट्याच्या ७ हजार ४७० जागा आहेत.
हेही वाचा -
विमानात सिगारेट पिणं पडलं महागात
स्थायी समितीत ५५० कोटींचे प्रस्ताव मंजूर, आचारसंहितेआधी निर्णयांचा धडाका