Advertisement

बारावीच्या ८० लाख तपासलेल्या उत्तर पत्रिका पडून!

कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या पार्शवभूमीवर संघटनेने शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना त्यांच्याच आश्वासनाची आठवण करून दिली. पुढील मान्य मागण्यांचे आदेश निघेपर्यंत तपासलेल्या उत्तरपत्रिका आणि मार्कशीट बोर्डात जमा करणार नसल्याचं स्पष्ट केलं.

बारावीच्या ८० लाख तपासलेल्या उत्तर पत्रिका पडून!
SHARES

बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या, आता निकाल लागण्याची वेळ आली, तरी त्यांच्या निकालाचा गुंता काही सुटता सुटेना! कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने बारावीच्या ८० लाख उत्तरपत्रिका पडून असल्याचं समोर येत आहे.


तरीही आदेश निघालेले नाही

शिक्षण मंत्र्यांबरोबर महासंघाची बैठक झाली, त्यांनी पुढील तीन मागण्या मान्य करून दोन दिवसात आदेश काढण्याचे आश्वासन संघटनेस दिलं होतं. परंतु ८ दिवस झाले तरीही आदेश काही निघालेले नाहीत. म्हणून शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या पार्शवभूमीवर संघटनेने शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना त्यांच्याच आश्वासनाची आठवण करून दिली. पुढील मान्य मागण्यांचे आदेश निघेपर्यंत तपासलेल्या उत्तरपत्रिका आणि मार्कशीट बोर्डात जमा करणार नसल्याचं स्पष्ट केलं.


आश्वासनाचीही आठवण दिल्यानंतरही

एकदा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत झालेली बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे अर्थमंत्र्यांबरोबर पुढील मागण्यांबाबत या आठवड्यात बैठक घेऊन निर्णय करण्याच्या आश्वासनाचीही आठवण संघटनेने यावेळी त्यांना करून दिली असल्याचं महासंघाच्या सदस्यांनी स्पष्ट केलं.

८० लाख तापसलेल्या उत्तरपत्रिका नियमकां (मॉडरेटर्स) कडे पडून आहेत. अजून काही दिवस आंदोलन लांबल्यास १२ वीचा निकाल वेळेत लावणे कठीण होईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी दिलेले आश्वासन न पाळणाऱ्या शासनाचीच असेल असं संघटनेने शासनास कळवलं आहे.

अनिल देशमुख, अध्यक्ष, म.रा.कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ


हेही वाचा - 

सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, फेरपरीक्षेचं संकट टळलं

नाहीतर, बारावीच्या उत्तरपत्रिका, मार्कशीट बोर्डाकडे जमा करणार नाही...!

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा